ती पुढे निघून गेली आणि मी....; नेहा कक्करच्या EX हिमांश कोहलीची प्रतिक्रिया

2018 मध्ये नेमकं काय घडलं?

Updated: Apr 30, 2021, 09:41 AM IST
ती पुढे निघून गेली आणि मी....; नेहा कक्करच्या EX हिमांश कोहलीची प्रतिक्रिया

मुंबई : 2018 मध्ये गायिका नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्याचा खुलासा नेहा कक्करने एका रिऍलिटी शोच्या स्टेजवर केला होता. रडत रडत नेहाने घडलेला सगळा प्रकार सांगितला. यानंतर नेहा खूप चर्चेत आली. अगदी तिचे व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाले. मात्र हिमांश कोहली मात्र शांतच राहिला. याविषयावर पहिल्यांदाच हिमांशने मोकळेपणाने चर्चा केली आहे. 

नेहा कक्करने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केलं. या कपलने लग्नानंतर धुमाकूळ घातला. सोशल मीडियावर रोमँटिक फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत राहिले. 

ब्रेकअपवर काय म्हणाला हिमांश 

एका मुलाखतीत हिमांश कोहली म्हणाला की,'तो माझा ब्रेकअप होता. मला जगाला एक्सप्रेस करण्याची काही गरज नाही माझ्या घरात काय घडलं? यामुळे दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचा. कुणाला या प्रकरणात इंटरेस्ट आहे.' या घटनेनंतर हिमांश कोहलीबद्दल अनेक वेगवेगळ्या गोष्टी जगासमोर आल्या आणि लिहिल्या देखील गेल्या. मीडियाने देखील कोहलीवर काही गोष्टींचा परिणाम झाला. काही गोष्टी जशा घडायला हव्या होत्या तशा घडल्या. पण मी वाईट माणूस नाही. 

2018 मध्ये झालं ब्रेकअप 

हिमांशने एका मुलाखतीत या गोष्टी 2018 मध्ये सुरू झाल्याचा उल्लेख केला. मी आता नेहालाही ब्लेम केला नाही. ती पुढे निघून गेली आहे आणि ती आनंदी देखील आहे. मी तिच्यासाठीही आनंदी आहे आणि स्वतःसाठी देखील आनंदी आहे. मी आपल्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. पैसे कमवत आहे. जास्तित जास्त लोकांचं मनोरंजन करत आह. मात्र अजूनही काही लोकं 2018 मध्येच आहेत. ते त्यातून पुढे जातच नाहीत. आता आपण 2021 मध्ये आहेत. आता मी याबद्दल काहीच करू शकत नाही. काही लोकांना वाटतं की, मीच खराब आहे. मात्र मला माहित आहे की, मी वाईट व्यक्ती आहे.