भर रस्त्यात कोणी नेहा कक्करला रडवलं, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

भर रस्त्यात कोणामुळे ढसा-ढसा रडताना दिसली नेहा कक्कर...  

Updated: Dec 10, 2021, 10:55 AM IST
भर रस्त्यात कोणी नेहा कक्करला रडवलं, पाहून तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : गायिका नेहा कक्कर कायम चर्चेत असते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिकांच्या यादीत नेहाचा समावेश होतो. नेहाने आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे. एवढंच नाही तर तिच्या चाहत्याची संख्या देखील मोठी आहे. कोणत्याही ठिकाणी नेहाला पाहिलं की तिच्या चाहत्यांची एकचं गर्दी जमते. पण आता तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये नेहा तिच्या कारमध्ये बसलेली दिसत आहे. तेव्हा रस्त्यावर पैसे मागणाऱ्या मुलांनी नेहाला घेरलं आणि तिच्याकडून पैसे  मागण्यास सुरूवात केली. नेहाने मुलांना पैसे देखील दिले. ती सर्व परिस्थिती पाहून नेहा घाबरली आणि रडू लागली. सध्या सोशल मीडियावर नेहाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सांगायचं झालं तर, गायिका नेहा कक्कर आणि पंजाबी गायिका रोहनप्रीत 2020 मध्ये विवाहबंधनात अडकले. अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो शेअर करून दोघे  चाहत्यांनी कपल गोल्स देत असतात. सध्या नेहा जोधपूरमध्ये स्पॉट झाली होती.  नेहा आणि रोहनप्रीत, विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी जयपूरमध्ये दाखल झाल्याचं सांगण्यात आलं.