नायजेरिया : आमच्याकडे पैशांची काय कमी, असं म्हणणारे अनेकजण आपण पाहिले असतील. पण, असं म्हणणाऱ्यांपैकीच एका अतिशय लोकप्रिय कलाकाराने पैशांची कमतरचा नसूनही दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे. असं नेमकं का झालं असावं, हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना?
नायजेरियन आणि अमेरिकन संगीतकार डेविडो यानं एक अत्यंत मोठी घोषणा केली.
अत्यंत महत्वाची घोषणा करत अनाथ आश्रमांमध्ये आपण जवळपास 6000,000 डॉलर म्हणजेच जवळपास 4.5 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला.
ऑनलाईन पद्धतीनं त्याने ही मोहिम सुरु केली. ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
डेविडोने ट्विटरवर लिहिलं, 'तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला आवडेल असं गाणं साकारलं आहे, तर कृपया मला पैसे पाठवा.'
बुधवारी त्यानं निधी गोळा करण्यासाठीची ही मोहिम सुरु केली. ज्यानंतर पहिल्या 10 मिनिटांमध्येच त्यानं 17 हजार डॉलर इतका निधी गोळा केला.
शनिवारपर्यंत हा निधी 485,000 डॉलरपर्यंत पोहोचला. धर्मदाय कामांसाठी या निधीचा वापर केला जाईल, असं त्यानं जाहीर केलं.
मोहिमेसाठी खुद्द डेविडो त्याच्या वतीनं 120,000 युएस डॉलर इतकं दानही देणार आहे. सध्या त्याच्या मदतीला काही सेलिब्रिटी मित्रही आले आहेत. ज्यामुळं त्याला मिळालेल्या दानामध्ये कमालीची वाढ झाली आहे.