कोणी 1 कोटी तर कोणी 10 लाख.... वायनाड लॅन्डस्लाइड पीडितांसाठी दाक्षिणात्य कलाकारांनी केलं 'इतकं' दान

South Celebrities Gave Donation For Wayanad Landslide : दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी वायनाडमध्ये झालेल्या नैसर्गित आपत्तीसाठी केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दिलं इतकं दान. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 5, 2024, 01:32 PM IST
कोणी 1 कोटी तर कोणी 10 लाख.... वायनाड लॅन्डस्लाइड पीडितांसाठी दाक्षिणात्य कलाकारांनी केलं 'इतकं' दान title=
(Photo Credit : Social Media)

South Celebrities Gave Donation For Wayanad Landslide : केरळच्या वायनाडमध्ये नैसर्गित आपत्तीमुळे खूप नुकसान झालं आहे. जास्त प्रमाणात पाऊस आल्यामुळे लॅन्डस्लाईड झाली आणि हा सगळा प्रकार घडला आहे. तिथे जे काही झालं ते पाहून सगळ्यांना खूप वाईट वाटतंय. खरंतर जुलै 29 जुलै रोजी मध्ये रात्री जोरात पाऊस आला त्यानंतर लॅन्डस्लाईड आणि अतिवृष्टी. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता मरणाऱ्यांची संख्या वाढली असून 365 झाली आहे. या घटनेला सहा दिवस झाले आहेत तर अजूनही सर्च ऑपरेशन हे सुरुच आहे. वायनाडची मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी हे समोर आले आहेत. अल्लू अर्जुन आणि मोहनलाल यांच्यानंतर आता चिरंजीवी आणि राम चरणनं देखील मदत केली आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या कोणत्या सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. 

दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी या मदत कोषात कोटींची रक्कम दान केली आहे. त्यासोबत त्यांनी या घटनेत ज्यांचे निधन झाले त्यावर दु:ख व्यक्त केलं आहे. चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरणनं त्यांच्या X अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत या कठीण काळातून जात असलेल्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली आहे. चिरंजीवी हे त्या पोस्टमध्ये म्हणाले की 'गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये निसर्गाच्या प्रकोपामुळे झालेल्या विध्वंसामुळे आणि शेकडो लोकांचा जीव गेला आहे. त्याचं मला खूप दु:खं वाटतं. त्या सगळ्या दुर्घटनेनं मी देखील खूप व्यथित झालो आहे. वायनाड दुर्घटनेत बळी गेलेल्या लोकांसाठी माझ्या मनात संवेदना आहे. चरण आणि मी मिळून केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये पीडितांच्या मदतीसाठी 1 कोटी रुपयांचे योगदान देत आहोत. या घटनेमुळे ज्यांचे आयुष्य उद्धवस्त झाले त्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो.' 

'पुष्पा 2' अभिनेता अल्लू अर्जुननं देखील त्यांना मदत केली आहे. त्यानं केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 25 लाख रुपये दान केले आहेत. याविषयी सांगत त्यानं एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं की 'मी वायनाडमध्ये झालेल्या या भूस्खलनामुळे खूप दु:खी आहे. केरळनं मला कायम खूप प्रेम दिलं आणि मी पुन्हा एकदा तयार झालेल्या केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 25 लाकी रुपये दान करत माझं योगदान देतोय. तुमच्या सुरक्षेसाठी आणि शक्तीसाठी प्रार्थना करत आहे.'

या आधी अभिनेता मोहनलाल यांनी देखील 3 कोटी रुपयांची मदत केली होती. इतकंच नाही तर त्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले होते. त्याची झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर दिली. त्यासोबतच नयनतारा आणि पती विग्नेश शिवननं केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 20 लाख रुपये दान केले आहेत. वायनाडमध्ये आता बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान, अजूनही अनेक लोक हे बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : आलिया भट्टला मध्यरात्री मेसेज करायची कतरिना! म्हणाली, 'कधी-कधी मला जाणवायचं की...'

दाक्षिणात्य अभिनेता सूर्या, ज्योतिका आणि सूर्याचा भाऊ कार्थी यांनी मिळून 50 लाख रुपये दान केले आहे. तर रश्मिका मंदानानं 10 लाख रुपये दान केले आहेत. चियान विक्रमनं 20 लाख रुपये दान केल्याची माहिती समोर आलेली आहे.