टाईट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केलं अनेकांना क्लीन बोल्ड; पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आपल्या बोल्ड स्टाईलने दररोज चाहत्यांना घायाळ करते.

Updated: Jun 19, 2022, 08:16 PM IST
टाईट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केलं अनेकांना क्लीन बोल्ड; पाहा फोटो title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आपल्या बोल्ड स्टाईलने दररोज चाहत्यांना घायाळ करते. आता पुन्हा एकदा दिशा पटानीने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दिशाचे हे फोटो काही मिनिटांतच व्हायरल झाले असून अवघ्या दोन तासांत यावर साडेआठ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. यासोबतच अभिनेत्रीच्या फॅन पेजवरही तिचा हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.

दिशा पटानीचा लेटेस्ट लूक
दिशाच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री अतिशय टाइट वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबतच ड्रेसमधील जाळीदार कटमुळे ती अधिक बोल्ड दिसत आहे. तुम्ही कमेंट सेक्शन बघितलं तर दिशाच्या या सिझलिंग स्टाईलवर नेटिझन्सच घायाळ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशा पटनी सोशल मीडियावर सक्रिय असते
दिशा पटानी जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा चाहते तिच्याकडे बघत राहतात. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या लूक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी नेहमी जोडलेली राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. अशा परिस्थितीत, युजर्स नेहमीच तिच्या नवीन लूकची आतुरतेने वाट पाहत असतात.