बोल्ड फोटोशूटने अभिनेत्री सान्या मल्होत्राने केलं चाहत्यांना घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. 

Updated: Jul 11, 2022, 09:24 PM IST
बोल्ड फोटोशूटने अभिनेत्री सान्या मल्होत्राने केलं चाहत्यांना घायाळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. सान्या मल्होत्राने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या पात्रांमध्ये तिचं आयुष्य पडद्यावर साकारलं आहे. परंतु यावेळी ती  तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे. खरंतर, सान्या मल्होत्राने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सान्या इतक्या बोल्ड स्टाईलमध्ये क्वचितच दिसते, पण तिच्या आत्मविश्वासाने तिने या बोल्ड लूकमध्ये प्राण सोडले आहेत.

सान्या मल्होत्राचं ​​नवीन फोटोशूट
सान्या मल्होत्राच्या बोल्ड फोटोबद्दल सांगायचं झालं तर, या फोटोमध्ये अभिनेत्री डेस्टिनेशन व्हेकेशनवर दिसत आहे. जिथे ती पूलच्या बाजूला उभी राहून पोज देताना दिसत आहे. यावेळी सान्याने बिकिनी घातली असून ती एका वेगळ्या झोनमध्ये दिसत आहे. हा सान्या मल्होत्राचं नवीन फोटो नसून थ्रोबॅक पिक्चर आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मोनोक्रोम फोटो शेअर करत, सान्या मल्होत्राने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मी फक्त येथेच आहे'. हे फोटो मालदीवचे आहेत. सान्याच्या या कॅप्शनवरून हे स्पष्ट होत आहे की, ती तिची सुट्टी खूप मिस करत आहे आणि लवकरच ती पुन्हा सुट्टीवर जाण्याचा विचार करत आहे. सान्याने ओपन केसांनी तिचा लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा अवतार पाहून काही चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.