दर्शकांना नाही आवडला 'परी', तरीही केली इतकी कमाई

अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' मार्चमध्ये होळीच्या दिवशी रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशीची कमाई पाहता हा सिनेमा वीकेंडमध्ये चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. 

Updated: Mar 9, 2018, 08:34 AM IST
दर्शकांना नाही आवडला 'परी', तरीही केली इतकी कमाई  title=

मुंबई : अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' मार्चमध्ये होळीच्या दिवशी रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशीची कमाई पाहता हा सिनेमा वीकेंडमध्ये चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. 

परी हा सिनेमा भयपट आहे. मात्र या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर भयपट सिनेमासारखी याची स्टोरी नाहीये. या सिनेमातील भूत कोणत्याही प्रकारचा बदला घेत नाही.

या सिनेमाची कथा बॉलिवूडच्या इतर हॉरर फिल्म्सपेक्षा वेगळी आहे. या सिनेमात अनुष्कासोबत अभिनेता परमब्रता चटोपाध्याय यांची प्रमुख भूमिका आहे.

या सिनेमाची निर्मिती स्लेट प्रॉडक्शन आणि क्रिअर्ज यांनी एकत्रितपणे केली आहे.

२१.०८ कोटींची कमाई 

चित्रपट समीक्षकांनी या सिनेमाचे चांगले रिव्ह्यू लिहिले पण तरीही प्रेक्षकांच्या पसंतीस हा सिनेमा काही उतरला नाही.

पण तरीही आतापर्यंत या सिनेमाने २१.०८ कोटी रुपयांची कमाई केली. होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येईल असा अंदाज होता.

पण तो खोटा ठरला.ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्शने या सिनमाच्या कमाईचे आकडे ट्विट केलेयत.