'पवित्र रिश्ता 2' फेम अभिनेता शाहीर शेखला कन्यारत्न

लाखो दिलों कि, धडकन शाहीर शेख वडील झाला आहे.

Updated: Sep 11, 2021, 04:32 PM IST
'पवित्र रिश्ता 2' फेम अभिनेता शाहीर शेखला कन्यारत्न title=

मुंबई : लाखो दिलों कि, धडकन शाहीर शेख वडील झाला आहे. शाहीर शेखची पत्नी रुचिका कपूरने शुक्रवारी एका गोड मुलीला जन्म दिला. मात्र अद्याप तरी शाहीर आणि रुचिका त्यांच्या लहान पाहुणीची त्यांनी अधिकृतपणे घोषणा केली नाही. एका अहवालानुसार, 10 सप्टेंबरच्या संध्याकाळी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी शाहीरची पत्नी रुचिका हिने मुलीला जन्म दिला.

गेल्या महिन्यात शाहीरने रुचिकासाठी बेबी शॉवर समारंभ आयोजित केला होता. या सोहळ्याला दोघांचे खास मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. रुचिका आणि शाहीरच्या या आनंदात क्रिस्टल डिसूझा आणि रिद्धी डोगरा यांनीही सहभाग घेतला होता. या कपलने निळ्या आणि गुलाबी रंगात बेबी शॉवरची सजावट केली होती, त्याने भिंतीवर हँगिंग लावली होती, त्यावर लिहिलं होतं की, बेबी शेख. या सोहळ्याची अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

शाहीर शेख हे महाभारतात अर्जुनच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. शाहीरने नोव्हेंबर 2020 मध्ये रुचिकाशी लग्न केलं. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. लग्नानंतर, दोघंही जम्मूमध्ये त्यांच्या जवळच्या लोकांसाठी एक भव्य पार्टी आयोजित करणार होते, मात्र कोविड -19 ची परिस्थिती पाहता त्यांनी त्यांची योजना रद्द केली.

शाहीर शेखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आजकाल शाहीर सोनी टीव्हीच्या शो कुछ रंग प्यार के ऐसे भी सीझन 2 मध्ये दिसत आहे. शाहीर शेख आणि एरिका फर्नांडिसची जोडी प्रेक्षकांना या शोच्या माध्यमातून पूर्वी आवडली होती आणि आजही दोघांना भरभरून प्रेम मिळत आहे. याशिवाय शाहीर लवकरच पवित्र रिश्ता 2 मध्ये दिसणार आहे. एकता कपूरच्या या शोमध्ये तो अंकिता लोखंडेसोबत दिसणार आहे.