Pawandeep Rajan सोबत परदेशी मुलीचा असा प्रकार, पाहून भडकली अरुणिता

 दोन्ही बाजूंकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Updated: Nov 19, 2021, 01:04 PM IST
Pawandeep Rajan सोबत परदेशी मुलीचा असा प्रकार, पाहून भडकली अरुणिता  title=

मुंबई : 'इंडियन आयडॉल 12' ची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ होती. यावेळी 12व्या सीजनचे विजेतेपद पर्वतावर राहणाऱ्या पवनदीप राजनकडे गेले. तर अरुणिता कांजीलाल दुसऱ्या तर सायली कांबळे तिसऱ्या क्रमांकावर राहिली. संपूर्ण सीजनमध्ये पवनदीप त्याच्या गाण्यांसह अरुणितासोबतच्या नात्याच्या बातम्यांमुळेही खूप चर्चेत होता.

मात्र, दोन्ही बाजूंकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. त्याचवेळी, शो संपल्यानंतरही दोघेही एकत्र चर्चेत राहिले आहेत. अरुणिता आणि पवनदीप अनेक म्युझिक व्हिडिओ आणि स्टेज शोमध्ये एकत्र काम करत आहेत. दरम्यान, अरुणिता आणि पवनदीपचा एक व्हिडिओ चर्चेत राहिला आहे. या व्हिडिओमध्ये अरुणिताचे नवे रूप पाहायला मिळत आहे.

पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांचा व्हायरल व्हिडिओ त्यांच्या फॅन पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यांचा हा व्हिडिओ थेट कार्यक्रमातील आहे. यामध्ये पवनदीप आणि अरुणिता स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहेत. दरम्यान, पवन गिटार काढण्यासाठी बाजूला जातो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण गिटार त्याच्या गळ्यातून उतरत नाही. तेवढ्यात या कार्यक्रमाचा भाग असलेली एक परदेशी मुलगी पवनदीपकडे जाते आणि गिटार काढायला मदत करते. परदेशी मुलीला पवन जवळ पाहून अरुणिता लगेच त्याच्याकडे जाते आणि पवनला स्वतः मदत करते. यादरम्यान अरुणिताच्या चेहऱ्याचे हावभाव पाहण्यासारखे होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे.

त्याचवेळी चाहते या व्हिडिओवर सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करताना यूजर्स मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने कमेंट करत 'अरूचा राग बघा' असे लिहिले.