गडगंज श्रीमंत युट्यूबरच्या दोन पत्नी रस्त्यावर विकतायत फुलं? व्हायरल फोटोमुळे नेटकरी आश्चर्यचकित

Payal and Krutika Malik Look: सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात दोन अभिनेत्री या अगदी रस्त्यावरील गरीब महिलांप्रमाणे दिसत आहेत. त्यांनी हातात फुलही विकायला घेतली आहेत. परंतु या कोणी रस्त्यावरील फुलं विकणाऱ्या महिला नसून या युट्यूबरच्या पत्नी आहेत. 

Updated: Jun 25, 2023, 06:59 PM IST
गडगंज श्रीमंत युट्यूबरच्या दोन पत्नी रस्त्यावर विकतायत फुलं? व्हायरल फोटोमुळे नेटकरी आश्चर्यचकित title=
Payal and Krutika Malik new look goes viral becomes street flower seller

Payal and Krutika Malik Look: सध्या जमाना आहे तो म्हणजे युट्यूबचा त्यामुळे युट्यूबवर विविध तऱ्हेचा कंटेट हा व्हायरल होताना दिसतो. सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अरमान मल्लिक याची. त्याच्या दोन्ही पत्नी पायल मल्लिक आणि कृतिका मल्लिक या दोघींची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी त्या दोघी एकत्र गरोदर असल्याच्याही चर्चा रंगलेल्या होत्या. त्यामुळे त्या दोघींची चांगलीच चर्चा रंगली होती. त्या दोघींचेही अरमान प्रमाणे युट्यूब चॅनल आहे. त्या तिघांचे एकत्र फोटोही अनेकदा व्हायरल झाले आहेत. पायल आणि कृतिका यांचे प्रेग्नंन्सी फोटोशूटही फार व्हायरल झाले होते. या दोघींचे एकत्र म्युझिक व्हिडीओही आहे. अरमान आणि पायल मल्लिकला एक लहान मुलगाही आहे. तोही एक युट्यूबर आणि रॅपर आहे. त्यामुळे त्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. 

या अरमानच्या या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल चर्चेत आल्या आहेत. पायलनं इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्या दोघींनी रस्त्यावर ज्याप्रमाणे गरीब महिला फूल विकत असतात. त्याप्रमाणे या दोघीही फूल विकताना दिसत आहेत. त्यांनीही त्या रस्त्यावरील फूलवाल्या बायकांप्रमाणे वेशभूषा केली आहे. डोक्यावर आंबडा आणि केसा गजरा माळला आहे. त्यांनी साडी परिधान केली असून नाकात रिंग आहे आणि पायातही पैंजण आहे. त्यांनी थोडेफार दागिनेही घातले आहे. सोबतच त्यांनी फुलांच्या अलंकाराचाही साज केला आहे. त्यांच्या या लुकचीही चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या या फोटोवर नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. 

हेही वाचा - तेच सौंदर्य, तेच ग्लॅमर; इंडस्ट्रीत येण्यापूर्वी प्राजक्ता माळी कशी दिसायची?

त्यांच्या या लुकनं त्यांच्या चाहत्यांना गोंधळातही टाकलं आहे. नेमकं असं काय झालं की या दोघीही रस्त्यावर एकदम फूल वैगेरे विकायला लागल्या आहेत. परंतु यामागील कारणंही त्यांनीच समोर आणलं आहे. त्यांचा एक नवा व्हिडीओ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार तेव्हा यावेळी त्यांनी यांसंदर्भात आपल्या नव्या व्हिडीओबद्दल माहिती दिली आहे. सध्या त्यांच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कृतिका आणि पायलची काही दिवसांपुर्वी एकत्र डिलिव्हरी झाली. तेव्हा त्या दोघींच्या या गुड न्यूजनं त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले होते. त्या दोघी आपल्या नवऱ्यासोबत आलिशान आयुष्य जगताना दिसतात.  त्यांनी आपला यावेळी पुर्ण लुकच बदलला आहे. त्यांनी अक्षरक्ष: रस्त्यावर राहणाऱ्या महिलांप्रमाणे आपली वेशभूषा केली आहे. चेहऱ्यावर मळकट रंग लावला आहे. हातात पेन्सिल विकायला घेतली आहे. हातात झोळी आहे आणि दुसऱ्या हातात फुलही विकायला घेतली आहे.