हॅरिपॉटर फेम अभिनेत्रीचं कॅन्सरमुळे निधन

अभिनेत्रीच्या नवऱ्याने शेअर केली दुःखद घटना 

Updated: Apr 17, 2021, 08:45 AM IST
हॅरिपॉटर फेम अभिनेत्रीचं कॅन्सरमुळे निधन

मुंबई : लोकप्रिय टीव्ही सीरिज पीकी ब्लाइंडर्स (Peaky Blinders) आणि हॅरी पॉटर (Harry Potter) सारख्या सीरिज सिनेमात दिसलेली अभिनेत्री हेलेन मैक्रोरी हिचं निधन झालं. शुक्रवारी अभिनेत्रीच्या नवऱ्याने ही दुःखद माहिती दिली. हेलेन 52 वर्षांची असून ती कॅन्सरशी झुंज देत होती. (Peaky Blinders actor Helen McCrory passes away) अखेर तिची प्राणज्योच मालवली. 

मैक्रोरी ब्रिटनमधील सर्वात सन्मानित अभिनेत्रींपैकी एक होती. अभिनेत्रीने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचं मन जिंकल होतं. सिनेमा आणि सीरिजच्या माध्यमातून अनेकदा दमदार भूमिका साकारल्या आहेत. इंग्लिश नाटक 'मेदा' करता तिला पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

हेलेन यांचा नवरा डॅमियन यांनी पोस्ट करत ही बातमी दिली. हेलेन ही अतिशय सुंदर आणि खरी होती. मला हे सांगायला अतिशय दुःख होत आहे. कॅन्सरशी अगदी एका हिरोप्रमाणे लढणाऱ्या हेलेनचं घरीच निधन झालं आहे. ती अखेरच्या वेळेस आपलं कुटूंब आणि मित्र परिवारासोबत होती. हेलेनचं तसंच निधन झालं जसं ती जीवन जगली होती. अगदी निडरप्रमाणे. देवा, आम्ही तिच्यावर खूप प्रेम केलं आणि आम्ही खूप नशिबवान आहोत कारण ती आमच्या आयुष्याचा भाग होती. ती एक चमकणारी स्टार होती. मेकक्रोरीने होमलँड फेम अभिनेत्यासोबत 2007 साली लग्न केलं. या दोघांना दोन मुलं आहे.

हॅरी पॉटरच्या पुस्तकाची लेखिका जे के रोलिंग हिने हेलेनला श्रद्धांजली वाहिली आहे. ही खूप धक्कादायक माहिती आहे. हेलेनचे अनेक सिनेमे मला आवडतात.