मुंबई : यंदाचं वर्ष हे पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. यावर्षी पु.ल.शी निगडीत अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. गंधार संगोराम या पुण्याच्या पु.ल.प्रेमी आणि संगीतकाराने पु.लं.ना मानवंदना देण्यासाठी पु.लंच्या हस्ताक्षराचा फॉण्ट तयार केला आहे. त्याच्या 'बी बिरबर डॉट कॉम' या वेबसाइटवर त्याने हा फॉण्ट सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
या फॉण्टचे अनावरण हे आजच्या दिवशी म्हणजे १२ जून रोजी पु.लंच्या स्मृतीदिनी करण्यात आले आहे. पु.ल. देशपांडे हे मराठी साहित्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या हस्ताक्षराचे डिजिटल प्रतीक 'पुल१००' या नावाने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रसिकांना पु.लंच्या अक्षरलेखनातील मजा डिजिटल फॉण्टमध्येही अनुभवता येणार आहे.
I was born in a family where reading books was considered as important as eating. It made life simpler, because I had a...
Posted by Gandhaar Sangoram on Thursday, June 11, 2020
गंधारने तयार केलेल्या या वेबसाइटवर आपलं ईमेल आयडी देऊन हा मोफत फॉण्ट मिळवता येणार आहे. फॉण्ट डाऊनलोड करण्यासाठी BeBirbal.in/pula100 या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.