सर्वांसमोर कपड्यांची चैन उघडणाऱ्या अभिनेत्रीला अटक? 

व्हिडिओत एक प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या शर्टची चेन उघडताना दिसत आहे.

Updated: Feb 23, 2022, 02:10 PM IST
सर्वांसमोर कपड्यांची चैन उघडणाऱ्या अभिनेत्रीला अटक?  title=

मुंबई : एकता कपूरचा अपकमिंग शो लॉक अप सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये कोण-कोण स्पर्धक दिसणार आहेत यावरुन आता हळूहळू पडदा उठत आहे. दरम्यान, एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या शर्टची चेन उघडताना दिसत आहे. अभिनेत्रीने असं केल्याप्रकरणी अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. पण खऱ्या आय़ुष्यात नाही तर, शोमध्ये

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पूनम पांडे आहे. व्हिडिओमध्ये पूनम पांडे तिच्या शर्टची चेन उघडत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर तिली अटक करून लॉकअपमध्ये बंद करण्यात आलं आहे. याचबरोबर पूनम पांडेवर हॉट असल्याचाही आरोप लावण्यात आला आहे.

एकता कपूरकडून व्हिडिओ शेअर 
हा व्हिडिओ एकता कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत एकताने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हॉटनेसमुळे अडकली पूनम पांडे पाहा 27 फेब्रुवारीपासून लॉक अप'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जाणून घ्या काय आहे Lock Upp
लॉक अपमध्ये, 15 ते 16 स्पर्धकांना बंद केलं जाईल. ज्यांना शोची होस्ट कंगना राणौतचे नियम पाळावे लागतील. पूनम पांडेशिवाय आणखी काही स्पर्धकांचीही नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये मुनव्वर फारुकी, निशा रावल आणि करण मेहरा यांच्या नावाचा समावेश आहे.