मुंबई : पॉर्नस्टार मिया खलिफाने पहिल्यांदाच तिच्या करिअरविषयी खुलेपणाने चर्चा केली आहे. एका अमेरिकन लेखकाला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या भुतकाळातील अनेक गोष्टी सर्वांसमोर आणल्या आहेत. पॉर्न बनवणाऱ्या कंपन्या तरुण मुलींना या क्षेत्रात येण्यासाठी अडकवत असल्याचा आरोप मियाने केला आहे. 26 वर्षीय मियाने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तीन महिने काम केलंय. 2014 च्या ऑक्टोबरमध्ये ती या क्षेत्रात आली आणि 2015च्या सुरुवातीलाच तिने हे काम सोडलं.
ज्यावेळी ती पॉर्न क्षेत्रातून मिया खलिफा बाहेर पडली, त्यावेळी ती एका प्रसिद्ध पॉर्नहब नावाच्या वेबसाईटवर स्टार बनली होती.
तिने मुलाखतीत बोलताना, 'अद्यापही मी माझ्या भूतकाळ स्वीकारु शकत नसल्याचं सांगितलंय.'
या इंडस्ट्रीबाबत मिया खलिफाने यावेळी अनेक खुलासे केले. लोकांना वाटतं की, 'मी या इंडस्ट्रीमध्ये खूप पैसे कमवते. पण यातून मी केवळ 12 हजार डॉलर कमवले असल्याचं तिने म्हटलंय. ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय भयावह असल्याचं ती म्हणाली. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर, सर्वसाधारण नोकरी शोधण्यासाठी अतिशय त्रास झाला. माझ्या भूतकाळामुळे मला इतर कंपन्यांमध्ये काम मिळत नसल्याचं अतिशय वाईट वाटतं', असं तिने सांगितलं.
ही इंडस्ट्री सोडल्यानंतरही अद्याप तिच्या नावाने एक वेबसाईट चालते. या वेबसाईटमुळे तिला कोणताही फायदा होत नाही. 'कसंही करुन वेबसाईटवरुन माझं नाव हटवलं जावं', अशी तिची इच्छा आहे, असं तिने सांगितलं.