इटलीत असलेल्या प्रभासच्या विलाचे एका महिन्याचे भाडे किती माहितीये? वाचून डोळे गरगरतील

Prabhas Italy Villa Rent: प्रभास या अभिनेत्याचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे इटलीमध्ये एक आलिशान विला आहे आणि चक्क त्यानं तो भाड्यानं दिला असून त्याला याचे तगडे भाडेही येते आहे. 

Updated: Jun 23, 2023, 08:53 PM IST
इटलीत असलेल्या प्रभासच्या विलाचे एका महिन्याचे भाडे किती माहितीये? वाचून डोळे गरगरतील  title=
prabhas gets 40 lakh rupees rent for his villa in italy says reports

Prabhas Italy Villa Rent: प्रभास हा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. बाहुबलीनंतर त्याच्या लोकप्रियतेत अमाप वाढ झाली होती. एवढंच नव्हे तर त्याच्यासाठी चक्क त्याच्या लग्नासाठी एकूण 5000 मुलींचे प्रस्ताव आले होते. आता त्याचा आदिपुरूष हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे त्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली आहे. प्रभासच्या नेटवर्थबद्दल बऱ्याचदा बोललं जातं. त्यामुळे त्याच्याकडे एकूण किती प्रोपर्टी आहे याचीही अनेकदा चर्चा रंगताना दिसते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या इटलीतल्या विलाची.

समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते आहे की त्यानं हा विला भाड्याने दिला आहे आणि त्याला या भाड्याचे महिन्याला तगडे पैसे मिळत आहेत. कदाचित तुम्ही आम्ही विचारही केला नसेल इतके पैसे तो या विलाच्या भाड्यातून कमावतो आहे. परंतु त्याच्या या पैशांतून तुम्ही नक्कीच 2 BHK फ्लॅट घ्याल.

एका रिजनल मीडिया रिपोर्टनुसार, या विलामधून प्रभासला चक्क 40 लाख रूपये मिळतात, तेही भाड्यातून. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की प्रभासनं हा विला लोकल टुरिस्ट आणि तेथील लोकांना भाड्यानं दिला आहे. प्रभासनं आपल्या पैशांतून हा विला खरेदी केला आहे. तेव्हा त्यानं आपला हा महागडा विला भाड्यानं देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, प्रभास हा भारतातील हायेस्ट पेड अभिनेता आहे. त्यानं बाहुबली आणि बाहुबलीनंतर आलेल्या अनेक सिनेमांसाठी तगडं मानधन घेतलं आहे. रिपोर्ट्सनुसार असंही समजते की त्यानं 'आदिपुरूष' या चित्रपटासाठी त्यानं 150 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. 

मध्यंतरी माहिती अशीही आली होती प्रभास आपला वाढदिवसही इटलीला साजरा करतो आणि सोबत आपल्या चित्रपटाचे शुटिंग संपले की तो येथे फिरायलाही जातो. याशिवायही प्रभासकडे अनेक प्रॉपर्टी आहेत. त्याच्याकडे हैदराबाद येथे एक घर आहे. ज्याचे इंटिरिअरही फार सुरेख आहे. त्याच्या अनेक आलिशान गाडी आहेत. त्याच्या रोल्स रॉयस, बीएमडबल्यू, जैगूआर अशा गाड्या आहेत. 

हेही वाचा - RRR फेम अभिनेत्याच्या नवजात मुलीसाठी चाहत्यांचं सरप्राईज गिफ्ट, अभिनेताही झाला भावूक

प्रभासचा 'आदिपुरूष' हा चित्रपट नाही नाही म्हणता म्हणता प्रदर्शित झाला आहे. परंतु या चित्रपटाला सध्या फारच टीकेला सामोरे जावे लागते आहे. 500 कोटी रुपयांची ही फिल्म आहे. आतापर्यंत प्रभासच्या या चित्रपटानं 450 कोटीही जगभरात पार केले आहेत. सोबतच आता प्रभास हा दीपिका पादूकोणसोबत 'प्रोजेक्ट के'मध्येही दिसणार आहे.