प्रभासचं लग्न ठरलं; NRI मुलीसोबत करणार लग्न

प्रभासचा 'राधे श्याम' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला 

Updated: Feb 8, 2021, 05:35 PM IST
प्रभासचं लग्न ठरलं; NRI मुलीसोबत करणार लग्न

मुंबई : साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) ची बॅक टू बॅक अनेक सिनेमांची चर्चा आहे. मात्र यासोबतच 'बाहुबली' स्टारच्या लव लाइफची (Prabhas Marriage) चर्चा होत सुरू आहे. प्रभास साऊथ सिनेमातील मोस्ट हँडसम बॅचलर म्हणून ओळखला जातो. तिथेच अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) देखील अद्याप अविवाहित आहे. हे दोघं अनेक सिनेमांत एकत्र दिसतात. यांच्या कमेस्ट्रिची जगभरात चर्चा रंगली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

असं असलं तरी आता प्रभासच्या लग्नाची चर्चा जोर धरू लागली आहे. महत्वाची बाब म्हणजे प्रभास लवकरच लग्न करणार आहे. त्याच्या लग्नाची तयारी प्लानिंगमध्ये आहे. अनुष्का शेट्टीसोबत नाही तर प्रभास एका एनआरआयमुलीसोबत लग्न करणार आहे. टॉलिवूड नेटच्या रिपोर्टनुसार प्रभास अमेरिकेत राहत असलेल्या एका सॉफ्टवेअर कंपनीच्या फाऊंडरच्या मुलीसोबत लग्न करणार आहे. याकरता दोन्ही कुटुंबातील मंडळींची चर्चा रंगली आहे. प्रभासने देखील या लग्नाला परवानगी दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

प्रभासची होणारी पत्नी ही अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मुलगी आहे. त्यांचं लग्न लव मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे. प्रभासनं या लग्नाला होकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे. प्रभास सध्या आपल्या आगामी राधे श्याम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.