फार्महाऊस का विकत घेतलंस? प्राजक्ता माळी म्हणाली 'माझ्या प्रेमासाठी....'

Prajakta Mali Farmhouse : प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं फार्महाऊस खरेदी करण्याचं खरं कारण सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 15, 2023, 06:17 PM IST
फार्महाऊस का विकत घेतलंस? प्राजक्ता माळी म्हणाली 'माझ्या प्रेमासाठी....' title=
(Photo Credit : Social Media)

Prajakta Mali Farmhouse : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या तिच्या तीन अडकून सिताराम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. प्राजक्ता आता फक्त हास्यजत्रेच्या शूटिंगमध्ये नाही तर त्यासोबतच तिच्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनच्या वेळी प्राजक्ता माळीनं अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

प्राजक्तानं एका मुलाखतीत फार्महाऊस घेण्याचं कारण सांगितलं आहे. प्राजक्ताला यावेळी फार्महाऊस घेण्याचा निर्णय कसा घेतला याविषयी प्रश्न विचारला? त्यावर उत्तर देत प्राजक्ता म्हणाली की 'मला निसर्गात रहायला खूप जास्त आवडतं. मी अख्खा दिवस झाडाखाली काढू शकते. माझ्या आत्मिक समाधानातून मी फार्महाऊस घेण्याचा निर्णय घेतला. गुंतवणूक वगैरे ही नंतरची गोष्ट आहे. मला एवढं मोठं फार्महाऊस घ्यायच नव्हतं. माझं तेवढं बजेटही नव्हतं. पण ते घर बघितल्यानंतर मी त्याच्या प्रेमात पडले. कारण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवळंच दिसते. घराच्या मागे डोंगर, धबधबे आणि झरे आहेत. तिथे फक्त पाण्याचा आवाज येतो. शेवटी मी विचार केला सगळं गेलं तेल लावत. एखादी गोष्ट आवडली तर रुखरुख करुन जगण्यात काय अर्थ आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राजक्ताचं हे फार्महाऊस कर्जतला आहे. तिनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या फार्महाऊस विषयी सांगितलं होतं. प्राजक्तानं त्याशिवाय प्राजक्ता प्रभू असं त्या फार्महाऊसचं नाव असल्याचे देखील सांगितले. प्राजक्ताच्या या फार्महाऊसवर हास्यजत्रेची टिम देखील गेली होती. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 

हेही वाचा : आईच्या कोणत्या गोष्टींना त्रासली पलक तिवारी, लेकीनं व्हिडीओ शेअर करत केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, प्राजक्ताविषयी बोलायचे झाले तर 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सुहासिनी' या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, तिला खरी ओळख ही 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेने मिळवून दिली. या मालिकेनंतर प्राजक्ताला 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमामुळे जास्त लोकप्रियता मिळाली. ती या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करते. इतकंच नाही तर तिनं तिचा एक बिझनेस देखील सुरु केला आहे. प्राजक्ताराज ब्रँड द्वारे ती मराठमोळे दागिने विकते. तिच्या या दागिन्यांना सध्या भरपूर मागणी आहे. अनेक सेलिब्रिटी आणि त्यासोबतच दागिन्यांचे चाहते देखील प्राजक्ताचे दागिने खरेदी करण्यास पसंती देतात.