प्रसिद्ध अभिनेता Prasad Oak ची पोस्ट चर्चेत, अभिनेत्यानं दिली मोठी बातमी!

Prasad Oak नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दरम्यान, प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Jan 2, 2023, 05:53 PM IST
प्रसिद्ध अभिनेता Prasad Oak ची पोस्ट चर्चेत, अभिनेत्यानं दिली मोठी बातमी! title=

Prasad Oak In Movie on a Legendary Actor Prabhakar Panshikar : मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रसाद हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा तो मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. प्रसादनं गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 'धर्मवीर' (Dharmaveer) हा चित्रपट केला. या चित्रपटानं प्रसादला एक वेगळीच ओळख मिळवून दिली होती. कारण इतकी वर्षे चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर त्याला पहिला मुख्य भूमिका असलेला चित्रपट मिळाला होता. 'धर्मवीर' च्या यशानंतर आता नव्या वर्षात प्रसाद दिवंगत दिग्गज नाट्यकलावंत यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी प्रसादनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. 

प्रसादनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी नवीन वर्षी प्रसादनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्रसादनं त्याच्या नव्या चित्रपटाविषयी या पोस्टमध्ये खुलासा केला आहे. यावेळी प्रसाद हा दिग्गज नाट्यकलावंत प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी प्रसादनं या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. टआणि...डॉ. काशिनाथ घाणेकर नंतर मराठी रंगभूमीवरील सोनेरी इतिहासातलं पुढचं पर्व, तोच मी... प्रभाकर पणशीकर प्रसाद ओक' असं या पोस्टरमध्ये म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रभाकर पणशीकर म्हणजेच 'पंत' हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. आता प्रभाकर पणशीकर यांच्या आयुष्यावरील या चित्रपटात प्रसाद ओक दिसणार आहे. धर्मवीर या चित्रपटातील त्याच्या अप्रतिम अभिनयानंतर त्याला प्रेक्षक आता या प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, प्रसाद ओकची ही बातमी ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

हेही वाचा : अखेर भांडं फुटलंच! 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला Kiss करताना Tamannaah Bhatia कॅमेऱ्यात झाली कैद

प्रसाद ओक हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. प्रसादनं फक्त चित्रपट नाही तर मालिकांमध्येही काम केलं आहे. प्रसादनं त्याच्या अभिनयानं सगळ्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी प्रसादचा 'धर्मवीर' (Dharmaveer)  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रसादनं धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका साकारली होती. 'धर्मवीर' चित्रपटाला मिळालेलं यश पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा भाग (Dharmaveer 2) बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातली आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पटकथा हे सगळं अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे.