close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रिती झिंटा म्हणते 'कोई मिल गया...'

प्रिती झिंटा अनेक वर्षांपसून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.

Updated: Oct 21, 2019, 01:01 PM IST
प्रिती झिंटा म्हणते 'कोई मिल गया...'

मुंबई : बॉलिवूडमध्ये एककाळ गाजवलेली अभिनेत्री प्रिती झिंटा अनेक वर्षांपसून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. सध्या ती तिचा पूर्णवेळ फक्त आयपीएलला देत आहे. गत वर्षी तिचा 'भैयाजी सुपरहीट' चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु तिचा हा चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करण्यात फेल ठरला. तर नुकताच प्रितीची भेट अभिनेता ह्रतिक रोशनसोबत झाली आहे. 

या भेटी दरम्यानचा एक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'कोई मिल गया...' असे लिहिले आहे. चाहत्यांना त्यांचा हा फोटो चांगलाच पसंतीस पडला आहे. 

२००३ साली प्रदर्शित झालेल्या 'कोई मिल गया' चित्रपटात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर देखील दमदार कमाई केली होती. या चित्रपटाच्या कथेने चाहत्यांच्या मनावर आधिराज्य गाजवले होते. 

तर ह्रतिक रोशनचा 'वॉर' चित्रपट चाहत्यांची मने जिंकण्यास यशस्वी झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'वॉर'ने ३०० कोटी रूपयांचा आकडा पार केला आहे. चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री वाणी कपूर मुख्य भूमिकेत झळकत आहे.