मुंबई : सोशल मीडिया सेंसेशन अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने आपल्या नजरेच्या इशाऱ्यांनी चाहत्यांना घायाळ केलं होतं. आजही तिच्या नजरेच्या अदा चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतात. परंतु प्रिया आता तिच्या नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. यामध्ये तिने कोणत्याही प्रकारे नजरेचे इशारे केले नसून ती तिच्या आणखी एका कलेमुळे चर्चेत आली आहे. तर आता प्रिया तिच्या आवाजामुळे संगीत कौशल्यामुळे चर्चेत आली आहे.
प्रियाने यूट्यूबवर स्वतःचं चॅनल सुरू केलं आहे. तिने या चॅनलला प्रिया असं नाव दिलं आहे. शिवाय तिने यूट्यूबवर स्वतःच्या आवाजात स्वरबद्द केलेलं गाणं देखील पोस्ट केलं आहे. अभिनेत्री उर्मिला मांतोडकर स्टारर 'रंगीला' चित्रपटातील 'हाय राम ये क्या हुआ' हे गाणं प्रियाने गायलं आहे.
सध्या सोशल मीडियावर तिचा आवाज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय चाहत्यांनी देखील तिच्या या कौशल्याचे कौतुक केलं आहे. दरम्यान प्रियाला तिच्या नजरेच्या अदाकारीमुळे रातोरात स्टार केलं होतं.
त्यानंतर ती यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली. 'ओरू अदार लव' चित्रपटातील भूमिकेमुळे तिची लोकप्रियता वाढली. प्रिया आता लवकरच 'श्रीदेवी बंग्लो', 'लव हॅकर्स' चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.