Priyanka Chopra:च्या रंगात रंगला निक जोनस, परदेशी सासू-ससाऱ्यांसोबत खेळली धमाकेदार होळी

प्रियांकाने सोशल मीडियावर रंगबेरंगी अवतारातले फोटो शेअर केले आहेत

Updated: Mar 29, 2021, 01:52 PM IST
 Priyanka Chopra:च्या रंगात रंगला निक जोनस, परदेशी सासू-ससाऱ्यांसोबत खेळली धमाकेदार होळी title=

मुंबई : ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा आणि पती निक जोनस सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. सोशल मीडियावरुन निक प्रियांका स्वत:चे व्हीडीओ आणि फोटो शेअर करत असतात. नुकताच या दोघांनी होळीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये संपूर्ण जोनस फॅमिली रंग खेळताना दिसत आहेत. फोटोत प्रियांका, पती निक जोनस आणि प्रियंकाचे सासू सासरे दिसत आहेत. या परिवाराला बघून जोनस परिवार होळीची धमाल मस्ती करताना दिसत आहेत

प्रियांकाने सोशल मीडियावर रंगबेरंगी अवतारातले फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सगळेच पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत. प्रियंकाने हातात गन पिचकारी पकडली आहे आणि भरपूर मस्तीच्या मूडमध्ये प्रियांका या फोटोंमध्ये दिसत आहे. होळीचे हे फोटो शेअर करत प्रियांकाने या फोटोला ''रंगांचा सण होळी, हा माझा सर्वात आवडता सण आहे. मला आशा आहे की, आपण सर्वजण हा सण आपल्या कुटुंबासह घरीच साजरा करूया.'' अशा आशयाचं कॅप्शनदेखील दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)

प्रियंकाने ही पोस्ट शेअर करत कोविडची सगळी काळजी घेत होळी खेळा, असा सल्ला देखील प्रियंकाने कॅप्शनमधून दिला आहे. तर निकने देखील होळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निकने आपल्या होळी पोस्टमध्ये लिहलं आहे की, 'माझ्या आणि माझ्या परिवाराकडून आपणा सर्वांना होळी शुभेच्छा' प्रियंका सध्या लंडनमध्ये आहे आणि लंडनमध्येच प्रियंका होळीचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NICK JONɅS (@nickjonas)

बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रियंका आणि निक ही चाहत्यांची आवडती जोडी आहे. काही दिवसांपूर्वी पती निक आणि प्रियांका दोघांनी मिळून ऑस्करच्या नॉमिनेशन अनाउंस केलं होतं. तर दुसरीकडे प्रियंका 'अनफिनिश्ड' पुस्तक आणि 'ओपरा विनफ्रे' यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे प्रियंका बरीच चर्चेत होती. याआधी प्रियंका राजकुमार रावसोबत 'द व्हाइट टाइगर' या सिनेमांत दिसली होती.