Priyanka Chopra बोल्ड ड्रेस , हाय हीलसह बास्केटबॉल ग्राउंडमध्ये, Hrithik Roshan ने फिरकी घेतली आणि ट्रोल झाली

प्रियकांचा फोटो सध्या सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ 

Updated: Mar 10, 2021, 05:51 PM IST
Priyanka Chopra बोल्ड ड्रेस , हाय हीलसह बास्केटबॉल ग्राउंडमध्ये, Hrithik Roshan ने फिरकी घेतली आणि ट्रोल झाली title=

मुंबई : बॉलीवूड आणि हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नेहमीच सोशल मीडियावर प्रियंकाची चर्चा होत असते. एकीकडे काहिदिवसांपासून तिचं पुस्तक 'अनफिनिश्ड' मुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे प्रियांका तिचं रेस्टोरेंट बिजनेसमुळे चर्चेत आहे. मात्र प्रियांकाची चर्चा आता पुस्तक किंवा बिजनेसमुळे नाही तर चक्क तिच्या लूकमुळे होते आहे आणि या फोटोमुळे तिला ट्रोलिंगला शिकार व्हावं लागत आहे.

मिसवर्ल्ड किताब पटवलेल्या प्रियंकानं एक फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तीनं काळ्यारंगाचा बोल्ड ड्रेस परिधान आहे. या लूकमध्ये तीनं हाय हिल सेंडल घातल्या आहेत. मात्र आकार्षणाची बाब म्हणजे प्रियांका या अवतारात बास्केटबॉल ग्राउंडमध्ये हातात बास्केटबॉल घेवून उभी हे पाहायला मिळतंय.

प्रियकांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. शेअर केलेल्या या फोटोनंतर नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंन्टचा वर्षाव केलाय. 'हाहा..नाईस' अश्या आशयाची कमेंन्ट करत ह्रतिकनंदेखील प्रियांकाला ट्रोल केलंय. येवढच न्हवे तर काही युजर्सने तिच्या ड्रेस आणि बास्केटबॉलच्या कॉम्बिनेशनवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एकिकडे प्रियंकाच्या या फोटोला नेटकरी ट्रोल करतायेत तर दुसरीकडे तिचे चाहते या फोटोला पसंती दाखवत आहेत. प्रियांकाने चा हा फोटो 'वोग' मॅग्झिनसाठी असल्याचं समजतय. १ डिसेंबर २०१८ रोजी प्रियांका अमेरिकन पॉपस्टार निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकली.

बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील पॉप्युलर कपलमधून हे एक कपल आहे. लवकरचं ती कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर 'द मॅट्रिक्स 4' हा हॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.