अरेच्छा...! इथुन मिळाली होय Pushpa च्या 'श्रीवल्ली'ची स्टेप, पाहा Video

गाण्याच्या हिंदी वर्जननं भलतीच जादू केल्याचं दिसून येत आहे.   

Updated: Jan 19, 2022, 03:01 PM IST
अरेच्छा...! इथुन मिळाली होय Pushpa च्या 'श्रीवल्ली'ची स्टेप, पाहा Video  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या आणि सहकलाकारांच्या अभिनयानं नटलेला 'पुष्पा : द राईज' हा चित्रपट प्रदर्शित झाल्या दिवसापासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. (Pushpa: The Rise)

फक्त चित्रपट नव्हे, तर चित्रपटातील डायलॉग, डान्स हे सारंकाही आता कमालीचं व्हायरल होऊ लागलं आहे. 

इतकंच काय, तर कपड्यांचा ट्रेंडही फॉलो केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

'पुष्पा'ची ही चर्चा कमी होती की काय, तर चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्याच्या हिंदी वर्जननं भलतीच जादू केल्याचं दिसून येत आहे. 

गाण्यामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन एक स्टेप करताना दिसतो. एक पाय उचलून दुसरा त्याच्या मागे ओढत खांदा उडवत तो एका बाजुला जातो. 

अनेकांनीच या स्टेवर धमाल रिल्सही केले. पण, मुळात तुम्ही ही स्टेप सुचली तरी कशी असा प्रश्न इतक्यातच कुणाला विचारलाय का ? 

बरं, प्रश्न विचारला नसेल तरी ठिक. तुम्ही लोकलनं एकदा तर प्रवास केलाच असेल नाही? 

उत्तर जर होकारार्थी असेल तर, तुम्हाला ही स्टेप कुठून आली हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

कारण, लोकलमधील एक व्हायरल व्हिडीओ ते स्पष्टपणे सांगून जात आहे. 

जिथं रेल्वेस्थानकावर, लोकलमध्ये, जिन्यांवरून पुढे सरकताना एका बाजून जागा मिळेत तशी आपली वाट काढणारा एक मुलगा आपल्या नजरेस पडतो. 

त्याचा हा व्हिडीओ पाहून लक्षात येतंय, अरेच्छा... इथून आली होय 'श्रीवल्ली'ची ती स्टेप.... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhiraj sanap (@dhirajjjjj_)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रिल्सपैकीच हासुद्धा एक व्हिडीओ. पण, सध्या हा व्हिडीओ कमालीचा गाजतोय, ज्यामुळं गाण्याची स्टेप इथूनच आली, असाच पाढा नेटकरी वाचू लागले आहेत. तुम्हाला काय वाटतं?