PVR Full Form: ज्या 'पीव्हीआर'मध्ये तुम्ही सिनेमे पाहाता, त्याचा फुल फॉर्म माहिती आहे का?

'PVR' चा Full Form जाणून घेतल्यानंतर तुम्ही व्हाल आश्चर्यचकित...  

Updated: Apr 12, 2022, 10:22 AM IST
PVR Full Form: ज्या 'पीव्हीआर'मध्ये तुम्ही सिनेमे पाहाता, त्याचा फुल फॉर्म माहिती आहे का? title=

मुंबई : कोणताही नवीन सिनेमा प्रदर्शित झाला, तर तो पाहाण्यासाठी आपण मित्रांसोबत नाही तर, कुटुंबासोबत थिएटरमध्ये  जातो. शिवाय सिनेमा पाहाता-पाहाता पॉपकॉर्नचा आनंद घेतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही सिनेमाचं तिकिट काढत तेव्हा पीव्हीआरचं नाव नक्कीच ऐकलं असेल. हे नाव अनेकवेळा समोर आल्यानंतरही VR चा फूल फॉर्म काय असू शकतो? आसा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. त्यामुळे आज जाणून घेवू पीव्हीआरचा फुल फॉर्म...

पीवीआरचा फुल फॉर्म
तुम्हाला PVR चं  फुल फॉर्म काय आहे? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. PVR चं  फुल फॉर्म 'प्रिया व्हिलेज रोड शो' (Priya Village Roadshow) असं आहे. 

हे पूर्ण नाव जाणून घेतल्यावर तुम्हाला थोडा धक्का बसेल. PVR कंपनीचे मालक अजय बिजली आहेत, ही कंपनी 1978 मध्ये अजय बिजलीच्या वडिलांनी स्थापन केली होती.

कंपनीची सुरुवात
कंपनीची सुरुवात दक्षिण दिल्लीत प्रिया सिनेमा म्हणून करण्यात आली होती. बिजली यांच्या वडिलांनी कंपनी 1978 साली विकत घेतली. त्यांचे वडील अमृतसर ट्रांसपोर्ट कंपनीचे मालक होते.  1988 मध्ये, बिजली यांनी सिनेमा हॉल चालवण्यास सुरुवात केली... ज्यामुळे  PVR चा जन्म झाला

कधी सुरू झाली कंपनी
PVR ही भारतातील सर्वात मोठी थिएटर कंपनी आहे. PVR चे देशातील  71 शहरांमध्ये 176 सिनेमा हॉल आणि 854 स्क्रीन आहेत. आज भारतात अनेक मुख्य शहरांमध्ये पीव्हीआर आहे.

PVR दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई इत्यादी भारतातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये आहे. PVR 102 शहरांमध्ये आहे आणि त्याची संख्या वाढत आहे. श्रीलंकेतही अनेक पीव्हीआर आहेत.