न्यूड सीन दिल्यानंतर राधिकाला येत होत्या अडल्ट सिनेमांच्या ऑफर

राधिकाने साउथ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका नामांकित अभिनेत्याला थप्पड मारली होती

Updated: Apr 20, 2021, 09:33 PM IST
न्यूड सीन दिल्यानंतर राधिकाला येत होत्या अडल्ट सिनेमांच्या ऑफर

मुंबई: बॉलिवूडची सुंदर आणि हॉट अभिनेत्री राधिका आपटेने अभिनयातून सिनेमात आपला ठसा उमटविला आहे. सिनेमांमध्ये सगळ्या भूमिका साकारण्यात माहिर असलेली राधिका सामान्य जीवनातसुद्धा एक अव्यवहार्य आणि तेजस्वी मानली जाते. एकदा तिने साउथ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका नामांकित अभिनेत्याला थप्पड मारली होती.

पहिल्यावेळी मुंबईने आपलं मानलं नाही
7 सप्टेंबर1985मध्ये तामिळनाडूच्या वेल्लोर येथील डॉक्टर जोडप्याच्या घरी जन्मलेल्या राधिका आपटेने नाटकातून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली. तिथून ती मुंबईत चित्रपटांमध्ये काम करायला आली. तिला मुंबईत सुरुवातील चांगला अनुभव मिळाला नाही म्हणुन ती पुण्यात गेली. 2005 मध्ये 'वाह लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटात तिला एक छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर २००९मध्ये मराठी सिनेमा 'घो माला असा हवा' या मराठी चित्रपटात तिला काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील तिचं काम चांगलंच गाजलं

सुरुवातीला छोटे रोल मिळायचे
राधिका आपटेच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या सिनेमांमध्ये तिने छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या. २०११मध्ये आलेल्या 'शोर इन द सिटी' या चित्रपटानंतर लोक तिला थोडे ओळखू लागले. यापूर्वी तिचे २०१० मध्ये 'रक्त चरित्र' आणि 'रक्त चरित्र 2' चित्रपट प्रदर्शित झाले होते. या दरम्यान राधिका आपटेने 'वेटिंग रूम' या चित्रपटातही काम केलं. या सिनेमांमधील तिच्या अभिनयाला ओळख मिळाली आणि हळूहळू ती स्टार बनली

राधिका आपटेने हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू बंगाली यासह अनेक भाषांमध्ये अनेक चित्रपटात काम केलं आहे. तर 5० हून अधिक लघुपट केले आहेत. पॅडमॅन, पैडमैन, पार्चड, मांझी द माउंटेन मॅन, बदलापुर, अंधाधुंध हे सिनेमा तिचे प्रचंड गाजले. अहल्या या बंगाली शॉर्ट फिल्मच्या यशाने राधिकाचं करिअर आणखी मजबूत बनलं.

साऊथ स्टारला थप्पड मारलं
नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये राधिका आपटेने कास्टिंग काउचबाबत विचारलेल्या प्रश्नावर एक किस्सा शेअर केला. राधिकाने सांगितले की, एका तमिळ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्याला जोरात थप्पड मारली. तिने सांगितले की, ती त्या अभिनेत्याला यापूर्वी कधीच भेटली नव्हती आणि ती त्याला ओळखतही नव्हती. तरीही त्या अनोळखी अभिनेत्याने अचानक तिच्या पायाला गुदगुल्या करायला सुरवात केली. अभिनेत्याच्या या वागणुकीचा तिला भयंकर राग आला आणि म्हणुन तिने त्याच्या कानाखाली लगावली.

अडल्ट चित्रपटांसाठी येऊ लागले फोन
राधिका आपटेने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, अहल्या आणि बदलापूरमध्ये दिलेल्या न्यूड सीननंतर तिला अडल्ट कॉमेडी चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्याची माहिती तिने दिली . राधिका म्हणाली की, तीला जेव्हा कॉल यायचा तेव्हा ती समोरची व्यक्ति असं म्हणायची, अहल्या आणि बदलापुरात तुम्ही खुप चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे तुम्हाला अडल्ट चित्रपट करण्यास काहिच हरकत नाही. राधिकाने अशा लोकांशी बोलणेही बंद केलं होतं.