अमेरिकेत अंड्याचा पदार्थ केल्यानं राहुल देशपांडे ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'देशपांडे तुम्हीसुद्धा?'

Rahul Deshpande : खेकडा खाल्लानं काही दिवसांपुर्वी अभिनेत्री स्पृहा जोशी ही ट्रोल झाली होती. आता लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी अंड्याचा पदार्थ केल्यानं ते ट्रोल झाले आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हिडीओखाली नकारात्मक प्रतिक्रियाही केल्या आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 15, 2023, 08:11 PM IST
अमेरिकेत अंड्याचा पदार्थ केल्यानं राहुल देशपांडे ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'देशपांडे तुम्हीसुद्धा?' title=
rahul deshpande gets trolled for making egg recipe

Rahul Deshpande: शास्त्रीय गायक, संगीतकार राहुल देशपांडे हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. आपल्या संगीताच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि गायनाचे व्हिडीओही ते शेअर करताना दिसतात. अनेकदा ते आपल्या मुलीसोबतगही अनेक व्हिडीओ पोस्ट करताना दिसतात. त्यांच्या अनेक व्हिडीओजना चाहत्यांची वाहावा पाहायला मिळते. परंतु सध्या त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे त्यांना बरंच ट्रोल करण्यात आलं आहे. सध्या काही दिवसांपुर्वी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात ते अंड्याचा पदार्थ करत आहेत. त्यामुळे त्यांना बऱ्याच नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. सध्या त्यांची त्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यावरून त्यांनी तुम्ही ब्राह्मण आहेत ना मग? असा सवाल केला आहे. यावेळी त्यांच्या या व्हिडीओखाली चाहत्यांनी लांबलचक पोस्ट लिहिल्या आहेत. 

राहूल देशपांडे ट्रोल :

यावेळी त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत. एकानं लिहिलंय की, ''That looks good! "ब्राह्मण नावालाच" म्हणणाऱ्या लोकांनी लक्षात घ्या.. ब्राह्मण खरेच नावालाच आहोत.. त्यांना ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या करत आहेत. जुनेच आचारविचार धरून बसलो तर कसं चालेल? बाकीच्या जातींचे लोक पूर्वज करत आले तेच करत आहेत का अजून? नाही ना? मग ब्राह्मणांना वेगळा न्याय कशाला? जुन्या चालीरीती पाळल्या तर कर्मठ आणि वेगळे काही केले की "तुम्ही फक्त नावाचे ब्राह्मण" that's ridiculous. जात पात विसरा लोकहो! आता veg/ non veg काय चांगलं काय वाईट हा वेगळा मुद्दा आहे त्यात जातपात आणायची गरज नाही. कलाकाराची कला पहावी.. परदेशात राहत असताना manage करतात ते पहा!'' अशा या लांबलचक कमेंट नंतर एका युझरनं लिहिलंय की, ''देशपांडे? काय दाखवता लोकांना तुम्ही? मागे पण ते नाना पाटेकरचे हाड दाखविली होती? एखादा चांगल्या गायका कडून लोकांना ह्या अपेक्षा नसतात. आणि महत्वाचं लोकांच्या कमेंट वाचा''

तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''महेश काळे सर एक नंबर गायक आणि संस्कारी आहेत... असल्या कृती मुळेच देशपांडे कधी आवडले नाहीत तुमच्या गायकीला काय करता'' तर अशाच एकानं लिहिलंय की, ''देशपांडे? तुम्हीसुद्धा?'' तर अशाच एका तिसऱ्या युझरनं लिहिलंय की, ''तुमच्या आवाजात साक्षात पांडुरंगाचे दर्शन होते...! प्रत्येक पंढरीचा वारकरी तुम्हाला देव मानतो...! लहान तोंडी मोठा घास, माफ करा सर पण, आपल्या सारख्या व्यक्तीला हे शोभा देत नाही...'' अशा एक नाही तर बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत. 

चाहत्यांचा सपोर्टही : 

काहींनी म्हटलंय की, “ट्रोलर्सकडे लक्ष देऊ नका. तुम्ही खूप छान गायक आहात आणि तुमच्या चाहत्यांना तुमची अशी कोणतीही डिश आवडेल.” तर दुसऱ्याने म्हणाला, “तुम्ही जे काही करता ते मनापासून करता. तुमच्यावर कोणतीही बंधनं नाहीत. तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे आवडते ते करा.” 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

राहुल देशपांडे हे मराठी चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय आणि नामवंत गायक आहेत. त्यांचे देशात-परदेशात त्यांच्या संगीताचे अनेक कार्यक्रम होताना दिसतात. त्यांचे हे कार्यक्रमही चांगलेच लोकप्रिय आहेत. 'कट्यार काळजात घुसली' नाटक, 'मी वसंतराव', 'अमलताश' या चित्रपटांतून त्यांनी अभिनयही केला आहे. ज्येष्ठ दिवंगत शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांचे ते नातू आहेत.