बायोग्राफी : राजेश खन्‍ना यांची हेमा मालिनीसोबत अनप्रोफेशनल वागणूक, दोघांचे संबध कधीच चागंले नव्हते

हेमा मालिनी यांच्या 'बियांड द ड्रीम गर्ल' या बायोग्राफीनुसार हेमा आणि राजेश खन्ना यांचे संबंध कधीच सामान्य नव्हते

Updated: Apr 21, 2021, 08:06 PM IST
बायोग्राफी : राजेश खन्‍ना यांची हेमा मालिनीसोबत अनप्रोफेशनल वागणूक, दोघांचे संबध कधीच चागंले नव्हते title=

मुंबई : राजेश खन्ना यांना बॉलिवूडचा पहिल्या सुपरस्टारचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांनी सलग एका मागोमाग एक 15 सुपर डुपर हिट चित्रपट दिले आहे. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. हेमा मालिनी यांच्या 'बियांड द ड्रीम गर्ल' या बायोग्राफीनुसार हेमा आणि राजेश खन्ना यांचे संबंध कधीच सामान्य नव्हते.

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार
राजेश खन्नाचा यांचं स्टारडम इतकं जबरदस्त होतं की. त्यांच्या एका झलकसाठी मुली त्यांच्या मागे-पुढे पळायचा. बर्‍याच अभिनेत्री देखील त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी रांगा लावत असत. राजेश खन्ना यांनी जया बच्चन, डिंपल कपाडिया, हेमा मालिनी यांच्यासह अनेक अभिनेत्रींसोबत सुपरहिट चित्रपट दिले. राजेश खन्ना यांचे त्यांच्या सर्व कोस्‍टार बरोबर चांगले संबंध होते

हेमा मालिनी यांच्या बायोग्राफीमधून खुलासा
राजेश खन्ना यांचे हेमा मालिनीशी असलेले संबंध त्यांच्या बियॉन्ड द ड्रीम गर्ल या पुस्तकात उघड झाले आहेत. हेमा मालिनीच्या खऱ्या जीवनातील किस्से संपादक आणि निर्माता राम कमल मुखर्जी यांनी बियॉन्ड द ड्रीम गर्ल या पुस्तकात लिहिले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान हेमा यांचं पुस्तक लॉन्च केलं होतं. या पुस्तकात हेमा मालिनी यांनी राजेश खन्नाबद्दल बर्‍याच गोष्टी शेअर केल्या आहेत.

राजेश खन्ना यांची अनप्रोफेशनल वागणूक
हेमा मालिनी यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की. 'राजेश खन्ना माझ्याशी जरा विचित्र वागायचे. जेव्हा दोघ एकत्र काम करत होतो तेव्हा राजेश एक सुपरस्टार होते आणि त्यांचे स्टारडम नेहमी त्यांच्या सोबत असायचं. ते सेटवर पडून असायचे आणि बेशिस्तपणे वागायचे. 'काय होतं ते मला माहित नाही, मात्र काहितरी असं होतं राजेश खन्नाबरोबर जे मला अजिबात आवडायचं नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x