‘जब ठोकना होता है, तो मैं बात नहीं करता!’ रजनीकांतच्या जेलरचा ट्रेलर एकदा पाहाच

Rajnikant Jailer Trailer : रजनीकांत यांचा 'जेलर' हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की या चित्रपटातून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 3, 2023, 04:45 PM IST
‘जब ठोकना होता है, तो मैं बात नहीं करता!’ रजनीकांतच्या जेलरचा ट्रेलर एकदा पाहाच title=
August 3, 2023 | rajnikant and tamanna bhatia movie jailer trailer releses watch the full video

Rajnikant Jailer Trailer : 'जेलर' हा सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या या सुपरहीट ट्रेलरची. 72 वर्षांचे रजनीकांत आजही तितकेच एव्हरग्रीन दिसतात. या ट्रेलरमधूनही त्यांनी प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात 'इंटरटेन' करण्याचा प्रयत्न केला आहे. सोबत त्यांनी या चित्रपटात भरपूर मसालाही भरला आहे. चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया त्याचसोबत 'बाहुबली'ची शिवगामीदेवी म्हणजेच राम्या कृष्णनही दिसणार आहेत. रजनीकांत यांच्या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. काहीच दिवसांपुर्वी या चित्रपटातील 'कवाला' हे गाणं रिलिज झालं आहे आणि या गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. आता रजनीकांत यांच्या बहुप्रतीक्षित ट्रेलरची सर्वत्र चर्चा होती आता हा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधून रजनीकांत यांचा हटके अंदाज पाहायला मिळतो आहे. 

यावेळी जॅकी श्रॉफही चित्रपटातून दिसणार आहेत. त्यांच्याही आवाजाला डब करण्यात आलेले आहे. रजनीकांत यांचा लुकही फार हटके आणि वेगळा वाटतो आहे. सोबतच ते 72 वर्षांचे वाटतच नसून ते अगदी 27 वर्षांचे यंग हिरोचं वाटतं आहेत. त्यामुळे त्यांच्या फिटनेसची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यापुर्वी या चित्रपटाचे नावं हे 'थलायवर 169' असं होतं. परंतु आता या चित्रपटाचे नावं हे 'जेलर' असं करण्यात आलं आहे. तेव्हा या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. रंजनीकांत हे सध्याचे आघाडीचे अभिनेते आहेत. त्यांची कायमच चर्चा रंगलेली असते. आता त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागून राहिलेली होती. आता कधी नव्हे तो हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

हेही वाचा - 'तिच्यासारखी बायको...' उमेश कामतनं सांगितलं प्रियाशी लग्न करण्याचं खरं कारण

या ट्रेलरची सुरूवात जबरदस्त ड्रामा आणि अॅक्शननं होताना दिसते. रजनीकांतही अगदी हटके लुकमध्ये दिसत आहेत. जेलर म्हणजे रजनीकांतची भुमिका ही या चित्रपटाची स्टोरी आहे. त्यांच्या तुरूंगातील खतरनाक टोळीचे दर्शन घडते. आपल्या म्होरक्याची सुटका करण्यासाठी ही टोळी खतरनाक प्लॅन्स करतात. मुथुवेल असे त्यांच्या पात्राचे नावं दिसते आहे. यावेळी मुथुवेल हा प्लॅन रोकू शकतील का? 

हा चित्रपट अवध्या काही दिवसांनीच प्रदर्शित होतो आहे. जॅकी श्रॉफ, शिव राजकुमार आणि योगी बाबू यांच्या प्रमुख भुमिकाही आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.