राजपाल यादवने सांगितली कैद्यांसोबत घालवलेली काळरात्र, म्हणाला, 'तीन महिने...'

Rajpal Yadav in Jail:  सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे राजपाल यादव यांची. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या जेलचा अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी आपली कहाणी स्पष्ट केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 22, 2023, 04:35 PM IST
राजपाल यादवने सांगितली कैद्यांसोबत घालवलेली काळरात्र, म्हणाला, 'तीन महिने...' title=
rajpal yadav shares his experience in jail latest trending news in entertainment

Rajpal Yadav in Jail: राजपाल यादव हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. त्यांच्या विनोदाचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा ही रंगलेली असते. राजपाल यादव यांचा प्रवास हा काही सोप्पा नव्हता. इथवर येण्यासाठी त्यांना बरेच कष्ट उपसावे लागले आहेत. परंतु शेवटी माणूस हा त्याच्या कष्टानं आणि कौशल्यानं मोठा होत असतो. अभिनेते राजपाल यादव यांचाही प्रवास काहीच सोप्पा नव्हता. तुम्हाला माहितीये का की राजपाल यादव यांना एकेकाळी तुरूंगात राहावं लागलं आहे. याचा किस्सा खुद्द त्यांनीच सांगितला आहे. त्यामुळे त्यांची विशेष चर्चाही होती. 

हा प्रसंग आहे 2018 मधला. नुकत्याच दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी याचा खुलासा केला आहे. 'अता पता लापता' या चित्रपटासाठी हा सगळा प्रकार झाला होता. राजपाल यादव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. तेव्हा 5 कोटी रूपयांचे कर्ज परत फेडू न शकल्यानं तीन महिने त्यांना तुरूंगाची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी त्यांनी 2010 मध्ये कर्ज घेतले होते. याआधीही त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. परंतु आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून त्यांनी परत याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की जेलमधून बाहेर पडल्यानंतर एका सिनियअर अधिकाऱ्याशी प्रेरित होत त्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. ते म्हणाले की तुरूंगात असताना त्यांनी जेलमधील कैद्यासोबत वर्कशॉपही घेतली होती. 

यावेळी त्यांनी सिद्धार्थ कननला मुलाखत दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, जर मी फार गोंधळलेलो असतो तर लोकांनी मला फारच जज केलं असतं. कारण मला माहिती होतं की यापेक्षाही जास्त 100 टक्क्यांहून अधिक मजबूत होतं मी यातून बाहेर पडेन. कारण मलाही माझं आयुष्य हे फिनिक्सप्रमाणे सुंदर बनवायचे आहे. 

यावेळी ते पुढे म्हणाले, ''तीन महिन्यांपासून मी जेलमध्ये होतो. तेव्हा जेलचे अधीक्षक आणि स्टाफ यांनी मला एक नाही तर दोन सर्टिफिकेट दिले. तेव्हा मी त्यांना म्हणालो की ही जागा फारच ऐतिहासिक आहे. मी पुर्ण जीवनात आपल्यासारखं कोणीच पाहिलेलं नाही. तुमच्याकडून मला प्रेरणा मिळाली आहे. आम्हाला वाटलं की आपण जास्त तक्रारीचं करू परंतु या तीन महिन्यात भिंतीमध्येही तुम्ही जीव आणलात''

राजपाल यादव म्हणाले की त्या कैद्यांना अभिनयातही फार रस होता. त्यासाठी मी त्यांचे वर्कशॉपही घेतले होते. ज्यांना आयुष्यात काहीच रस नव्हता. त्यांनाही अभिनयात रस निर्माण झाला होता. आता राजपाल यादव हे 'वेलकम 3' मध्ये दिसणार आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x