Raju Srivastav यांनी अर्ध्यात सोडली पत्नीची साथ, जिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रीही फिक्या; पाहा Photo

Raju Srivastav's Wife Shikha Srivastava Photos:  राजूची पत्नी फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीतही खूप पुढे आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना टक्कर देते. 

Updated: Sep 21, 2022, 11:22 AM IST
Raju Srivastav यांनी अर्ध्यात सोडली पत्नीची साथ, जिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रीही फिक्या; पाहा Photo   title=

Raju Srivastav’s Wife Shikha Srivastava Photos : कॉमेडी किंग आणि आणि अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी आज वयाच्या 59 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. मात्र कॉमेडीच्या दुनियेत आपला खास ठसा उमटवलेले अभिनेता-कॉमेडियन राजू श्रीवास्तव आपल्या कॉमेडीमुळे नेहमीच चर्चेत असयाचे. छोट्या पडद्यावरील 'गजोधर भैया' या नावाने प्रसिद्ध असलेले राजू श्रीवास्तव आपल्या मजेशीर जोक्सने सर्वांचे मन जिंकली होती. (Raju Srivastav’s Wife Shikha Srivastava Photos) 

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे जन्मलेल्या राजू श्रीवास्तव यांच्या कॉमिक टायमिंगचे संपूर्ण जगाने कौतुक केले असून त्यांना कॉमेडी किंगचा किताबही मिळाला आहे. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टीव्ही शोमध्ये पहिल्यांदाच राजूने टीव्हीवर येऊन लोकांना हसवले. या शोमधील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या शोमध्ये राजू (Raju Srivastav) यांना 'द किंग ऑफ कॉमेडी' ही पदवीही देण्यात आली होती. राजू श्रीवास्तव यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या पत्नीची ओळख करून देऊ जी खुप  सुंदर आहे (Raju Srivastav Ki Patni) .

राजू श्रीवास्तव (Raju Srivastav’s Wife Shikha Srivastava) यांच्या पत्नीचे नाव शिखा श्रीवास्तव (Shikha Srivastava) आहे. राजूची पत्नी शिखा यांची फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीत खूप पुढे आहे. अनेकांनी तिची तुलना चित्रपट अभिनेत्रींसोबतही केली आहे. शिखा आणि राजूचे बाँडिंग खूपच घट्ट आहे. शिखा ही एक सशक्त महिला आहे जिला कुटुंब कसे बांधायचे हे माहित आहे.

59 वर्षीय राजू श्रीवास्तव यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव अंतरा श्रीवास्तव आणि मुलाचे नाव आयुष्मान श्रीवास्तव आहे. याआधीही शिखाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राजूने अभिनयाच्या दुनियेतही हात आजमावला आहे. मैने प्यार किया, बाजीगर, आमनी अथनी खरखा रुप्या, मैं प्रेम की दिवानी, बिग ब्रदर इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला आहे.