राखी सावंतच्या Ex पतीने तो व्हिडिओ शेअर करताच युजर्स भडकले

राखीपासून विभक्त होऊनही रितेश राखीबद्दल काही ना काही पोस्ट शेअर करत असतो.

Updated: Mar 14, 2022, 06:35 PM IST
राखी सावंतच्या Ex पतीने तो व्हिडिओ शेअर करताच युजर्स भडकले title=

मुंबई : राखी सावंत पती रितेश सिंहपासून वेगळी झाली आहे. काही दिवसांपूर्वी राखीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याचा खुलासा केला होता. राखीपासून विभक्त होऊनही रितेश राखीबद्दल काही ना काही पोस्ट शेअर करत असतो. आता त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामुळे लोकं त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत.

रितेशच्या पोस्टवर भडकले यूजर्स 
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रितेशने राखीच्या फोटोंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याच्या पार्श्वभूमीवर विशाल मिश्राचं 'लंबी जुदाई' गाणं वाजत आहे. व्हिडिओ शेअर करताना रितेशने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, फक्त हे गाणं अनुभवा. यावर आता यूजर्सने त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

रितेश सिंहचा हा व्हिडिओ पाहून यूजर्स त्याला जोरदार ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, तुम्हाला प्रसिद्धी मिळत नाही का? तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिलंय की, राखीच्या नावावर जगणं बंद करा, स्वतःची ओळख बनवा. थोडी तरी लाज बाळगा कुणीतरी लिहिलंय, आता डोकं ठिकाण्यावर आलयं. त्याचबरोबर आणखी एका युजरने लिहिलं, भेजा फ्राई केलयं देशाचं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रितेशने राखी सावंतला दिली धमकी!
याआधी, इंस्टाग्रामवर राखी सावंतचा एक फोटो शेअर करत रितेशने कॅप्शनमध्ये असं काही लिहिलं होतं ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली होती. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, राखी जी एक साधं सिंपल सजेशन. कृपया कोणत्याही गेम शोमध्ये तू माझ्यासमोर येऊ नकोस, नाहीतर तुझा बँड वाजवेन की तू पुन्हा कोणत्याही शोला जाणार नाहीस. 'बिग बॉस 15' च्या वाईल्ड कार्डचं काय झालं होतं तुम्हाला आठवतच असेल. यासाठी चिल कर.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x