मुंबई : ग्लॅमर इंडस्ट्रीतील ड्रामा क्वीन राखी सावंत, तिच्या बिंधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेतही असते. नुकतीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिगबॉसमधून आल्यानंतर शमिता शेट्टीने तिचा वाढदिवस साजरा केला, ज्यामध्ये तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबतच बिग बॉसच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश होता. अशा परिस्थितीत राखी सावंत या पार्टीत सहभागी होण्यासाठी पोहोचली आणि यावेळी तिचा पती रितेशही तिच्यासोबत होता.
अशा परिस्थितीत राखी तिच्या ड्रेसबद्दल चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसली. या दरम्यानचा राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती फोटोग्राफर्ससमोर पोज देण्यासाठी तिचं जॅकेट काढते आणि पोझ देऊ लागते.
शमिता शेट्टीच्या बर्थडे पार्टीत राखी सावंतने निळ्या रंगाचा डेनिम कॉर्सेट टॉप आणि शॉर्ट्स परिधान केली होती. यासोबतचं राखीने निळ्या रंगाचे डेनिम जॅकेट घातलं होतं. जीन्स शॉर्ट्स आणि जीन्स जॅकेटमध्ये राखी सावंतचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे.
राखीचा हा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. युजर्सनी राखीला तिच्या लूकसाठी ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे. लोकांना तिची शैली आवडली नाही आणि तिला युजर्सनी राखीला तिच्या लूकसाठी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.