लग्नाच्या 10 वर्षांनंतर Ram Charan नं चाहत्यांना दिली Good News!

Ram Charan च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून चिरंजीवी यांनी ही शेअर केली आहे. 

Updated: Dec 12, 2022, 06:00 PM IST
लग्नाच्या 10 वर्षांनंतर Ram Charan नं चाहत्यांना दिली Good News! title=

Ram Charan Expecting His First Child: दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरण (Ram Charn) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या RRR चित्रपटामुळे चर्चेत आहे. राम चरण आणि त्याची पत्नी लवकरच आई-वडील होणार आहेत. याची माहिती त्याचे वडील चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांची सोशल मीडियावरील ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

हेही वाचा : अखेर ठरलं! Salman Khan या अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात? मित्राने केला मोठा खुलासा

चिरंजीवी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की 'श्री हनुमान जीच्या आशीर्वादानं, आम्हाला हे कळविण्यात आनंद होत आहे की उपासना आणि राम चरण हे लवकर पालक होणार आहेत. उपासना त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सुरेखा आणि चिरंजीव कोनिडेली, शोभना आणि अनिल कामिनेनी खूप खूप प्रेम.' असे कॅप्शन दिले आहे. (Ram Charan's Wife Upasana Is Pregnant)

राम चरण आणि उपासना हे दोघं 2012 साली हैद्राबादमध्ये लग्न बंधनात अडकले आहेत. या दोघांची भेट ही एका स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. 2022 हे वर्ष रामसाठी त्याच्या खासगी आणि करिअरमध्ये खूप खास आहे. SS राजामौली दिग्दर्शित RRR या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाल्यापासून जगभरात हिट ठरला आहे. त्याच वेळी, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील ते वडील बनणार आहेत. (ram charan expecting his first child chiranjeevi break news to the fans) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ब्रिटीश वसाहतवादाच्या विरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतलेल्या दोन जीवनातील क्रांतिकारकांवर प्रेरित होऊन बनवण्यात आला आहे. RRR मध्ये ज्युनियर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. जगभरातील अनेक प्रशंसनीय दिग्दर्शकांनी त्याच्या कथाकथनाबद्दल त्याचे कौतुक केले. राजामौली नुकतेच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यूएस दौऱ्यावर गेल्याने RRR आता पुढच्या वर्षीच्या ऑस्कर ट्रॉफीकडे लक्ष देत आहे.