अभिनेता राम कपूरच्या मुलाला 'ऑस्कर' पुरस्कार

अभिनेता राम कपूर हा चेहरा हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचला आहे.

Updated: Mar 1, 2018, 09:02 PM IST
अभिनेता राम कपूरच्या मुलाला 'ऑस्कर' पुरस्कार   title=

मुंबई : अभिनेता राम कपूर हा चेहरा हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचला आहे.

राम कपूरप्रमाणेच त्याचा मुलगादेखील अभिनेय क्षेत्रामध्ये तरबेज आहे. राम कपूर यांच्याकडे जो अवॉर्ड नाही तो त्याच्या 9 वर्षीय मुलाकडे आहे.  

राम कपूरच्या मुलाकडे ऑस्कर  

अभिनेता राम कपूर यांचा नऊ वर्षांचा मुलगा आहे. तिसरी इयत्तेमध्ये शिकणार्‍या त्याच्या मुलाकडे ऑस्कर सर्टीफिकेट आहे. त्याचा एक फोटो नुकताच रामने ट्विटरवर शेअर केला आहे. 

शाळेमध्ये ड्रामा ( नाट्य)  आणि अभिनयक्षेत्रातील त्याच्या कौशल्याबाबत हे सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. याबाबतचे खास ट्विट त्याने केले आहे. 

 

 

 

राम कपूरचे प्रोजेक्ट 

राम कपूर सद्ध्या Alt Balaji ची वेब सीरीज 'करले तू भी मोहब्बत' मध्ये दिसणार आहे. सोबतच 'कॉमेडी हाई स्कूल' मध्येही राम कपूर आहेत.