मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गुरुवारी म्हणजेच आज लग्नबंधनात अडकले आहेत. आज सात फेरे घेऊन रणबीर आणि आलिया पती-पत्नी बनले आहे. दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आलिया-रणबीरचं वेडिंग कार्ड व्हायरल
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचं कार्ड इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन्ही स्टार्सची नावं दिसत आहेत. या कार्डवर लग्नाची तारीख १४ एप्रिल सांगितली जात आहे. पण या लग्नपत्रिकेत खूप मोठी चूक घडली आहे. जी भल्याभल्यांना ओळखता आली नाहीये. तुम्हालाही जर ही चूक ओळखता आली नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या वेडिंग कार्डमध्ये लग्नाची तारीख योग्य आहे मात्र लग्नाचा वार चूकीचा आहे.
त्यामुळे हे स्पष्ट होतं आहे की, ही लग्न पत्रिका खोटी आहे. याआधीही रणबीर आणि आलियाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. जी फोटोशॉप द्वारे एडिट करण्यात आली होती. आता व्हायरल झालेली लग्नपत्रिका देखील फोटोशॉपद्वारे एडिट केली आहे. रणबीर-आलिया लग्न १४ एप्रिलला करणार यावर नुकतच नीतू कपूरने शिक्कामोर्तब केलं होतं.
यादरम्यान पापाराझींनी नीतू आणि रिद्धिमाला विचारले की आता मला सांग लग्न कधी आहे? यावर नीतू आणि रिद्धिमाने एकत्र सांगितले की उद्या लग्न आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी रणबीर आणि आलिया (रणबीर कपूर आलिया भट्ट वेडिंग) लग्न करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीर आज दुपारी 2 वाजता सात फेरे घेणार आहेत.