रणबीर कपूर-आलिया भट्टचे रोमँटिक फोटो व्हायरल

 सध्या सगळीकडे रणबीर आलियाच्या लग्नाच्या चर्चा आहेत. 

Updated: Apr 16, 2022, 09:41 PM IST
रणबीर कपूर-आलिया भट्टचे रोमँटिक फोटो व्हायरल  title=

मुंबई : सध्या सगळीकडे रणबीर आलियाच्या लग्नाच्या चर्चा आहेत. चाहते या कपलचं कौतुक करताना थकत नाहीत, अगदी सेलिब्रिटीही. लग्नानंतर आता या जोडप्याचा एक एक सुंदर फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहतेही स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. त्याचबरोबर सेलेब्सचे हे फोटो पाहून तुम्हीही वाह म्हणाल. ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघंही एकमेकांचे झाले आहेत. या फोटोंमध्ये दोघांमधील प्रेम स्पष्टपणे दिसत आहे.

अभिनेत्री आलियाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक नाही तर अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोंमध्ये आलिया भट्ट रणबीरचा हात पकडून त्याला घेऊन जाताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती रणबीरकडे प्रेमाने बघताना दिसत आहे. इतकंच नाही तर आलियाच्या प्रेमात बुडलेल्या रणबीरने आलियाच्या नावाची हातावर मेंदी लावली आहे. ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. तर अजून एका फोटोत आलिया रणबीरच्या मिठीत दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे फोटो व्हायरल होताच दोघांच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने एका जोडीवर विश्वास ठेवायला हवा असं लिहिलं. तर दुसऱ्या चाहत्याने सांगितलं की, आलिया नव्या नवरीच्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांनी कमेंट्ससोबत गिफ्ट्सची लाईन लावली आहे.