संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरची जोरदार तयारी

संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरने जोरदार तयारी सुरू केली आहे

Updated: Aug 4, 2017, 06:52 PM IST
संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरची जोरदार तयारी title=

मुंबई : संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरने जोरदार तयारी सुरू केली आहे, रणबीरने संजय दत्त सारखं दिसण्यासाठी थोडीशीही संधी सोडलेली नाही. 

नुकताच रणबीर कपूर यांचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता, आणि या फोटोत बॉलीवूडचा चॉकलेट बॉयने बॉडी बनवलेली दिसून येत आहे. 

संजय दत्त सारखा लूक घेण्याचा हा प्रयत्न आहे. रणबीरचा हा फोटो पाहून तुम्ही नक्कीच म्हणू शकतात, की रणबीर मनापासून या सिनेमात, संजय दत्त सारखं दिसण्यासाठी मेहनत घेत आहे.