रंगोलीचा आलियावर 'अवॉर्ड फिक्सिंग'चा आरोप

कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. 

Updated: Dec 9, 2019, 12:36 PM IST
रंगोलीचा आलियावर 'अवॉर्ड फिक्सिंग'चा आरोप  title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नेहमी आपलं मत परखडपणे मांडत असल्यामुळे दोघी बहिणी कायम वादाच्या भोवऱ्यात असतात. तर आता रंगोलीने अभिनेत्री आलिया भट्टवर निशाना साधला आहे. रंगोलीने ट्विटरच्या माध्यमातून आलियाच्या व्यक्तीमत्वावर प्रश्न उपस्थित करत तिच्या वर 'अवॉर्ड फिक्सिंग'चा आरोप लावला. 

सध्या आलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या हातात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिसत आहे. कार्यक्रम सुरू होण्याआधीच आलियाच्या हातात पुरस्कार पाहिल्यामुळे रंगोली याविषयी प्रश्न उपस्थित केला. 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रंगोलीने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. 'एवढा तरी प्रमाणिकपणा उरला आहे की हे काम लपून करत आहेस. सगळ्यां समोर नाही.' अशा प्रकारे तिने आलियावर निशाना साधला आहे. 

आलियाने मात्र याप्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आलिया मागच्या दरवाज्यातून बाहेर पडताना दिसत आहे. त्यामुळे रंगोलीने तिच्यावर 'अवॉर्ड फिक्सिंग'चा आरोप लावला आहे. 

शिवाय या व्हिडिओमध्ये ती फोटो ७ वाजेपर्यंत प्रसारित करू नका असं बोलताना दिसत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियावर असंख्य प्रश्न उपस्थित करत आहेत. तर आलियाच्या हातात असलेला पुरस्कार फिक्स आहे का? अशा चर्चा सर्वत्र रंगत आहेत.