सोशल मीडियावर व्हायरल होतोय रणवीर सिंग- करिष्मा कपूरचा हा डान्स

सध्या अभिनेता रणवीर सिंहचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated: Sep 9, 2017, 02:22 PM IST
सोशल मीडियावर व्हायरल होतोय रणवीर सिंग- करिष्मा कपूरचा हा डान्स title=

मुंबई : सध्या अभिनेता रणवीर सिंहचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एका व्हिडिओत तो एकटाच नाचतोय तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये त्याच्या सोबत अभिनेत्री करिष्मा कपूरही नाचताना दिसतेय. 
 राजा बाबू चित्रपटातील ' सरकाय लो खटिया' या गाण्यावर करिष्मा आणि रणवीर  नाचताना दिसत आहेत. हे मूळ गाणं करिष्मा आणि गोविंदावर चित्रित करण्यात आले आहे. १९९४ साली रिलीज झालेलं हे गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे. 

 

YOLO SO LOLO #timepass @therealkarismakapoor @govinda_herono1

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 रणवीर सिंगने या दोन्ही गाण्यांचे व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका गाण्यात रणवीर खाटेवर उड्या मारत आहे तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये दोघेही बसून हटके अंदाजात डान्स करत आहेत. 
 रणवीर सिंग 'पद्मावती' या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनला वेळ लागत आहे.