My Forever Valentine म्हणतं रसिका सुनीलचा रोमँटिक अंदाज

असा दिवस केला साजरा 

Updated: Feb 15, 2021, 12:46 PM IST
My Forever Valentine म्हणतं रसिका सुनीलचा रोमँटिक अंदाज

मुंबई : 'झी मराठी' (Zee Marathi) वरील मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Navryachi Bayko) ही प्रेक्षकांच्या पसंतीची आहे. या मालिकेतील शनाया म्हणजे अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil)  ही प्रेक्षकांच्या पसंतीची अभिनेत्री आहे. रसिका सुनीलने कायमच आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलंय. मालिकेतून रसिका सुनीलने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही चाहते आजही तिच्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी रसिकाने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला. त्यानंतर चर्चांना उधाण आलं. 

आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. My Forever Valentine म्हणतं तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे. सोशल मिडियावर आपण आदित्य बिलागी (Aditya Bilagi) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केलं.  अनेक तरुणांचे हृदयाचे तुकडे झाले असतील हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यात  व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) दिवसानिमित्त रसिकाने आपल्या बॉयफ्रेंडसह अनोख्या अंदाजात या दिवसाचे सेलिब्रेशन केले आहे.

रसिका आणि आदित्य बिलागीने अतिशय फिल्मी स्टाईलने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन केले आहे. रसिकाने या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

या व्हिडिओमध्ये रसिका आणि आदित्य शॅम्पेन फोडताना दिसत आहे. हे दोघे एका डोंगरावर सेलिब्रेशन करताना दिसत आहे. त्यांच्यामागे हेलिकॉप्टरही दिसत आहे. यात रसिका सुनीलने काळ्या रंगाची शिफॉनची साडी नेसली असून यात ती खूपच हॉट दिसत आहे. 'माझा कायमचा व्हॅलेंटाईन आदित्य बिलागी..आम्हा दोघांकडून तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम आणि व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा' असे रसिकाने या पोस्टखाली लिहिले आहे.