अण्णा नाईक नव्हे, कोणा दुस-यासोबतच 'शेवंता'चा कमबॅक

तडक्याला आहे पम्मी तर होणारच ना लव्हस्टोरी यम्मी...

Updated: Oct 10, 2020, 08:57 AM IST
अण्णा नाईक नव्हे, कोणा दुस-यासोबतच 'शेवंता'चा कमबॅक

मुंबई : 'रात्रीस खेळ चाले २' मधील शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. शेवंताच्या अदांवर संपूर्ण महाराष्ट्र भाळला होता. मालिका संपल्यापासून प्रेक्षक शेवंताला खूप मिस करत आहेत. पण शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत पुनरागमन करणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

तडक्याला आहे पम्मी तर होणारच ना लव्हस्टोरी यम्मी... नवीन मालिका "तुझं माझं जमतंय" लवकरच... #ZeeYuva वर #TujhaMajhaJamtay @apurvanemlekarofficial @roshanvichare07 @asawari_bhartibhanudas

A post shared by Zee Yuva (@zeeyuva) on

झी युवावरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय' मध्ये लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अपूर्वा पम्मी हि व्यक्तिरेखा साकारणार आहे. पम्मी या भूमिकेतून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झालीय. या मालिकेची शैली विनोदी असून पम्मी ही या मालिकेला ग्लॅमरचा तडक देणार आहे. हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

या मालिकेचा नुकचताच प्रोमो लाँच करण्यात आला. 'रात्रीस खेळ चाले २' ही मालिका संपल्यानंतरही शेवंताची नशा कायमच आहे. त्यामुळे आता चाहत्यांना शेवंता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका प्रेक्षकांना झी युवा वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. ४ नोव्हेंवरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे.