मुंबई : हिंदी आणि मराठी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करत आहे. रेणुका शहाणेने सोशल मीडियावर पोस्ट केली असून ही वेब सिरीज अभिनव कमलने दिग्दर्शित केली आहे. 'व्हाट द फोक्स' या वेब सिरीजच्या यशानंतर आता एका मेडिकल कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे.
'स्टार्टिंग ट्रबल' या नव्या वेब सिरीजमधून रेणुका शहाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित ही वेब सिरीज आहे. एका डॉक्टरांवर आधारित पुस्तकांवर आधारित ही वेब सिरीज आहे. 2016 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. या सीरिजची कथा डॉ. जगदीश चतुर्वेदी यांच्या ‘इन्वेंटिंग मेडिकल डिव्हाइसेस’ या पुस्तकावर आधारित आहे. वैद्यकीय क्षेत्रावर विनोदी शैलीत भाष्य करणारी वेब सीरिज आहे.
Watch this hilarious medical comedy webseries #StartingTroubles streaming now on https://t.co/PavuCvzyE4 You can also download the HiiiH app from play store or App store and click the HiiiH TV button on the top right corner of the dashboard to watch the webseries #HiiiH pic.twitter.com/eB6eAQWoUr
— Renuka Shahane (@renukash) February 16, 2020
‘स्टार्टिंग ट्रबल’ या सीरिजचे सहा भाग आहेत. या सीरिजमध्ये रेणुका यांच्यासोबत डॉ. जगदीश चतुर्वेदी, कुरुश देबू, अनुष्का, राजेश पीआई, भरत चावला, जुई पवार, आदिती रावल, विक्रांत खट्टा, नेहा पाठक आणि राहुल सुब्रमण्यम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.