रणवीरशी लग्न, आवडतं दुसरंच कोण.. दीपिकाचं चाललंय काय? 

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या 'गेहराईं' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. 

Updated: Feb 11, 2022, 03:10 PM IST
रणवीरशी लग्न, आवडतं दुसरंच कोण.. दीपिकाचं चाललंय काय?  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या 'गेहराईं' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं प्रमोशनही जोरात करण्यात आलं आहे. आज दीपिका पदुकोणचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीही दिसणार आहेत. अलीकडेच, तिच्या एका मुलाखतीत अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या आवडत्या अभिनेत्याचं नाव सांगितलं ज्याच्यासोबत तिला काम करायचं आहे.

जर तुम्ही विचार करत असाल की,  रणवीर सिंग तिचा आवडता अभिनेता आहे. तर तसं अजिबात नाही. अभिनेत्री दीपिका पदुकोणची निवड वेगळी आहे. दीपिका पदुकोणचा आवडता अभिनेता बॉलीवूडमधील नाही. पण तिला साऊथ सिनेसृष्टीतील स्टार्स आवडतात. दीपिकाने खुलासा केला की, तिला अल्लू अर्जुन आणि ज्युनियर एनटीआर आवडतात. आणि त्यांच्यासोबत तिला काम करायचं आहे.

यासोबतच दीपिकाने तिच्या आवडत्या दिग्दर्शकाचं नावही उघड केलं आणि सांगितलं की, तिला अयान मुखर्जी आणि एसएस राजामौली यांच्यासोबतही काम करायचं आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, तिने अयान मुखर्जीसोबत 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटात काम केलं आहे. पण पुन्हा एकदा तिला त्यांच्यासोबत काम करायचं आहे. 

दीपिका पदुकोणकडे सध्या बरेच प्रोजेक्ट्स आहेत आणि ती गहरियानंतर अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दीपिका पदुकोण आता शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण' आणि हृतिक रोशनसोबत 'फायटर' या चित्रपटात दिसणार आहे.