'अनुरागने असं केलं असतं तर...' रिचा चड्ढा म्हणाली...

नेटकऱ्यांनी रिचावर टीकेची झोड उठवली आहे.  

Updated: Sep 23, 2020, 03:19 PM IST
'अनुरागने असं केलं असतं तर...' रिचा चड्ढा म्हणाली...

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. जेव्हापासून रिचा चड्ढने पायलला तिच्या चुकीच्या वक्तव्यामुळे कायदेशीर नोटीस पाठवली आहे, तेव्हापासून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. रिचाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका ट्रोलरला चांगलेचं खडसावले आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध व्यक्तींना आनंदी ठेवण्यासाठी अनेकदा सत्य गुलदस्त्यात ठेवलं जातं असा आरोप एका ट्रोलरने रिचावार केला. 

यावर उत्तर देताना रिचा म्हणाली, 'अनुरागने गैरवर्तन केलं असतं तर त्याला कायदेशीर नोटीस बजावण्या ऐवजी कोर्टात घेवून गेली असती. तुमची समज तुमच्या जवळ ठेवा. कारण मी घाबरणार नाही.' मुलीने बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील ती म्हणाली आहे.

पुढे पायल म्हणाली, आम्ही कायद्याची मदत घेवू आणि या वादावर योग्य तो निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करू. असं देखील रिचा म्हणाली आहे. दरम्यान पायल घोषकडून अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पायलचे वकील नितिन सातपुते यांनी सांगितलं की, बलात्कार, गैरवर्तन आणि अशोभनिय कृत्य केल्याप्रकरणी कलम  376, 354, 341, 342 अन्वये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पायल घोषचं बयान दाखल करण्यात आलं आहे. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करणार आहेत. पायल घोषने अटकेची मागणीही केली आहे.