शशी कपूरच्या निधनाची बातमी कळताच शूटिंग सोडून ऋषी कपूर मुंबईत दाखल

कोकिलाबेन रूग्णालयामध्ये दीर्घ आजारानंतर आज शशी कपूर यांचे मुंबईत झाले. शशी कपूर यांच्या जाण्याने बॉलिवूड क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 4, 2017, 08:10 PM IST
शशी कपूरच्या निधनाची बातमी कळताच शूटिंग सोडून ऋषी कपूर मुंबईत दाखल  title=

मुंबई : कोकिलाबेन रूग्णालयामध्ये दीर्घ आजारानंतर आज शशी कपूर यांचे मुंबईत झाले. शशी कपूर यांच्या जाण्याने बॉलिवूड क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ऋषी कपूर मुंबईत 

'राजमा चावल' या चित्रपटाच्या शूटींगसाठी ऋषी कपूर सध्या दिल्लीमध्ये होते. मात्र काकांच्या निधनाची बातमी कळताच तातडीने ऋषी कपूर मुंबईत दाखल झाले आहेत. 

चाईल्ड अ‍ॅक्टर 

अभिनेते शशी कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे चिरंजीव होते. हिंदी सिनेसृष्टीमध्ये ते चाईल्ड अ‍ॅक्टर म्हणून आले. 
'दीवार' हा शशी कपूरचा खास गाजलेला चित्रपट आहे. यश चोप्रा यांचा दीवार, राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम आणि यश चोप्रा यांच्या कभी कभी या चित्रपटामध्ये काम केले होते. शशी कपूरच्या या ३ शब्दांच्या डायलॉगने ते बीग बींपेक्षाही ठरले सुपरहीट  

कपूर कुटुंबीय शोकाकूल  

शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे. शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे कर्करोगाने काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर शशी कपूर एकटेच राहत होते. शशी कपूर यांच्याबद्दल १० रोचक गोष्टी