फास्टर फेणे चित्रपटामध्ये रितेश देशमुखने गायलं 'हे' गाणं

'लई भारी'  चित्रपटाच्या दमदार यशानंतर अभिनेता, निर्माता 'फास्टर फेणे' हा चित्रपट घेऊन रसिकांसमोर येत आहे. 

Updated: Oct 8, 2017, 01:45 PM IST
फास्टर फेणे चित्रपटामध्ये रितेश देशमुखने गायलं 'हे' गाणं  title=

मुंबई : 'लई भारी'  चित्रपटाच्या दमदार यशानंतर अभिनेता, निर्माता 'फास्टर फेणे' हा चित्रपट घेऊन रसिकांसमोर येत आहे. 

फास्टर फेणे या प्रमुख भूमिकेत अभिनेता अमेय वाघ झळकणार आहे. सोबतच पर्ण पेठे आणि गिरीश कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र या चित्रपटाचा निर्माता म्हणून भूमिका सांभाळणारा रितेश देखमुख या चित्रपटासाठी गायकही झाला आहे. 
फास्टर फेणे या चित्रपटासाठी रितेशने एक खास गाणं गायलं आहे. आणि याचित्रपटाचं शुटिंग फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रसिकांसमोरही आणले आहे. 

लाल आणि काळ्या रंगाचा चौकडींचा शर्ट त्यामध्ये पांढरा टीशर्ट अशा  फास्टर फेणेच्या ड्रेसकोडमध्ये बच्चेकंपनीसोबत रितेश आज हे खास गाणं शूट करत आहे. 
फेसबुकद्वारा त्याने या गाण्याचं मेकिंग पाहण्याची खास सोय रितेशच्या फेसबुक पेजवर करण्यात आली आहे. 

 

२७ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचे क्षितीज पटवर्धन यांनी लेखन केले आहे.

फास्टर फेणे’हे प्रसिद्ध लेखक भा. रा. भागवत यांनी जिवंत केलेलं एक लोकप्रिय पात्र आहे. भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात प्रचंड गाजले होते. बनेश उर्फ फास्टर फेणेच्या रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं. आता हे पात्र चित्रपटाच्या रूपात पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे.