'RRR' फेम अभिनेत्यासोबत भर कार्यक्रमात घडला धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. हा प्रकार पाहून अभिनेत्याचे चाहते घाबरले आहेत.

Updated: Mar 20, 2023, 07:48 PM IST
'RRR' फेम अभिनेत्यासोबत भर कार्यक्रमात घडला धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : अलीकडेच 'RRR' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'नाटू नाटू' या सुपरहिट गाण्याने ऑस्कर 2023 जिंकला आहे. या ऑस्कर विजेत्यासोबतच साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार राम चरणचं नाव चर्चेचा विषय बनलं आहे. तसंच, राम चरणला कोणत्याही वेगळ्या विशेष ओळखीची गरज नाही. सगळेजणच राम चरण यांना ओळखतात. कारण तो साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते चिरंजीवी यांचा मुलगा आहे. 

RRR फेम अभिनेता ज्युनियर एनटीआरचे संपुर्ण जगभरात चाहते आहेत. मात्र कधी कधी त्यांना जास्त प्रसिद्ध असणंही भोवतं. असंच काहीसं ज्युनियर एनटीआरच्या बाबतीत घडलं आहे. नुकताच राम चरणंने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या दरम्यान त्याच्यासोबत एक धक्कादायक किस्सा घडला जो ऐकून तुम्हालाही धक्क बसेल. 

या कार्यक्रमदरम्यान, तिथे अचानक एका चाहत्याने धक्काबुक्की करत त्याला मिठी मारली. चाहत्याच्या या विचित्र कृतीमुळे सर्वांनाच अडचणीत आणलं, मात्र अभिनेताही न डगमगता ही परिस्थिती त्याने अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआरचा एक चाहता बॉडीगार्ड्सच्या पायांमधून घुसला आणि अचानक स्टेजवर पोहोचला आणि त्याने ज्युनियर एनटीआरला मिठी मारली. यावेळी ज्युनियर एनटीआर सोबतच स्टेजवर उपस्थित असलेले इतर सर्वजणच त्याला पाहून खूप घाबरले, कुणालाच काय करावं हे समजंत नव्हतं. 

यानंतर मात्र  ज्युनियर एनटीआरने केलं ते पाहून सगळेचजण त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव करत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक चाहता धावत गार्ड्सच्या पाया खालून घुसतो आणि स्टेजवर पोहचतो. यानंतर तो अभिनेत्याला मिठी मारतो. एवढ्यात अभिनेता त्याचा संयम न गमावता तो चाहत्याची मिठी सोडवली आणि त्याचा हात चाहत्याच्या खांद्यावर ठेवला आणि त्याच्यासोबत  फोटोही काढला. यानंतर ज्युनियर एनटीआर तिथून स्माईल देत पुढे गेला.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्स अभिनेत्यावर कौतूकाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.