RRR मधील वाघासोबतच्या 'त्या' सीनचं अखेर सत्य समोर; ऐकून बसेल धक्का

या चित्रपटातील सुरुवातीला Jr. NTR आणि भयंकर वाघाची लढाईचा सीन आठवतो तुम्हाला. या सीनबद्दलचं एक सत्य समोर आलं आहे. 

Updated: Sep 3, 2022, 08:21 PM IST
RRR मधील वाघासोबतच्या 'त्या' सीनचं अखेर सत्य समोर; ऐकून बसेल धक्का title=
rrr ss rajamouli film tiger attacking bheem jr ntr the truth of the scene is finally revealed video

S. S. Rajamouli Film RRR VFX: RRRची क्रेझ अजूनही सोशल मीडियावर दिसून येत आहे. दिग्दर्शक राजामौली यांचा RRR हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाने थिएटरसोबतच OTT वरही मजबूत कमाई केली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत, RRR नेटफ्लिक्सच्या हिंदीतील आंतरराष्ट्रीय टॉप 10 चित्रपटांमध्ये राहिला. RRR बद्दल सतत नवनवीन गोष्टी बाहेर येत आहेत. त्याबद्दल जाणून लोकांना धक्का बसत आहे. या चित्रपटातील VFXचे जगभरातून कौतुक होत आहे. लोक या चित्रपटाच्या VFX च्या जादूने बांधले गेले आहेत.

वाघ खरा आहे?

या चित्रपटातील सुरुवातीला Jr. NTR आणि भयंकर वाघाची लढाईचा सीन आठवतो तुम्हाला. या सीनबद्दलचं एक सत्य समोर आलं आहे. या चित्रपटातील हे सर्वात अप्रतिम दृश्यं असल्याचं बोलं जातं आहे. या सीनमध्ये कोमाराम भीमा बनलेला ज्युनियर एनटीआर जंगलात असतो आणि मग वाघ त्याच्या मागे येतो. तो पुढे आणि वाघ मागे. यानंतर, भीम आपल्या साथीदारांच्या मदतीने या वाघाला जाळ्यात अडकवतो, परंतु त्या शक्तिशाली प्राण्याला नियंत्रित करणे सोपं नसतं. चित्रपटातील हा सीन बराच मोठा आणि श्वास रोखून धरणारा आहे. हा सीन खऱ्या वाघासोबत चित्रित केला आहे का, असा प्रश्न चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होतो, तर त्याचं साधं उत्तर असं की, हा वाघ म्हणजे संगणक ग्राफिक्सचा चमत्कार आहे. पण तरीही प्रश्न पडतो की हा सीन कसा शूट झाला?

सत्य पहा

चित्रपटाच्या रिलीजच्या जवळपास पाच महिन्यांनंतर, आता RRR चे व्हिज्युअल इफेक्ट्स पर्यवेक्षक श्रीनिवास मोहन यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यावरून तुम्ही समजू शकता की टायगरसोबतचा ज्युनियर एनटीआरचा हा सीन कसा शूट झाला होता. 

हा व्हिडीओ व्हायरल होत असून खूप बघितला जात आहे. एक मिनिट नऊ सेकंदाचा हा व्हिडीओही लोक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. तसाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.