इतना सन्नाट क्यो हैं भाई; शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

दिवाळी म्हणजे मराठी जनतेचा व तमाम हिंदू धर्मीयांचा चैतन्यदायी सण 

Updated: Oct 28, 2019, 08:36 AM IST
 इतना सन्नाट क्यो हैं भाई; शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

मुंबई : दिवाळीच्या सणाला सुरूवात झाली आहे. दिवाळी म्हणजे उत्साहाचा आणि चैतन्याचा सण पण हा उत्साह थोडा कमी झालेला दिसतो. दिवाळीला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. देशातील जनता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत दिवाळी साजरा करत असल्याचं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलंय. ऐन दिवाळीत बाजारपेठांत शुकशुकाट आहे आणि ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून देशातील पैसा विदेशी कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे. 

एवढंच नव्हे तर दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांतही धुमधडाका कमी आणि शुकशुकाटच अधिक झाल्याचं 'सामना'त म्हटलंय. 'इतना सन्नाटा क्यों हैं भाई?', असा सवाल 'सामना'त विचारला आहे. 

आतुरतेने वाट पाहायला लावणारा सण म्हणजे दिवाळी. अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत तसेच लहानांपासून ते थोरांपर्यंत सारेच जण हा सण उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीत नवीन काही तरी वस्तू घेण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे हा सण साजरा करतो. 

मंदीच्या सावटामुळे 30 ते 40 टक्के खरेदी कमी झाल्याने बाजारपेठांतील रौनकच हरवली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासून देशावर ओढवलेले आर्थिक अरिष्ट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. जनतेचा खिसा तर रिकामा झाला आहेच, पण सरकारी तिजोरीतही खडखडाटच दिसतो आहे, असं सामनात म्हटलंय. सामनाने भाजपावर यातून टिका केली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x