'सड़क' मधील किन्नरच्या भूमिकेला मिळाली होती लोकप्रियता, धर्मेंद्रसाठी लकी-चार्म होता हा खलनायक

खलनायक जितका वाईट असेल तितकाच चित्रपट सुपरहिट होतो.  

Updated: May 12, 2021, 04:54 PM IST
'सड़क' मधील किन्नरच्या भूमिकेला मिळाली होती लोकप्रियता, धर्मेंद्रसाठी लकी-चार्म होता हा खलनायक

मुंबई : चित्रपटात खलनायकाची भूमिका नाकारली जावू शकत नाही. असा विश्वास आहे की, खलनायक जितका वाईट असेल तितकाच चित्रपट सुपरहिट होतो.  म्हणूनच बॉलिवूडमध्ये खलनायकांनी असं भयानक रूप चाहत्यांना दाखवलं गेलं की, स्क्रिनवर येताच लोक हिरोच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करु लागतात. चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी खलनायकाची भूमिका अशा प्रकारे गाजवून. लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं. त्यातलंच एक नाव म्हणजे सदाशिव अमरापूरकर. सदाशिव यांचा जन्म ११ मे 1950 रोजी अहमदनगरमध्ये झाला. नजर टाकुया त्यांच्या जीवनाशी संबंधित काही किस्स्यांवर

'सडक' चित्रपटात सदाशिव यांनी एक खतरनाक खलनायक साकारला होता. ते प्रेक्षकांच्या आवडत्या खलनायकांपैकी एक होते. सदाशिव यांचं 2014 मध्ये फुफ्फुसातील संसर्गाच्या आजारामुळे निधन झालं, मात्र त्यांची कामगिरी अजूनही लोकांच्या हृदयात आहे.

सदाशिव यांनी जवळजवळ सर्व बॉलिवूड सुपरस्टार्सबरोबर काम केलं आहे. यामध्ये धर्मेंद्र, अमिताभ बच्चन ते आमिर, संजय दत्त आणि सलमान खान यांच्यासोबत त्यांनी स्क्रिन शेअर केली आहे. सदाशिव अमरापूरकर यांची सगळ्यात प्रसिद्ध भूमिका 'सडक' चित्रपटामधील मानली जाते. या चित्रपटात त्यांनी 'किन्नर'ची भूमिका साकारली होती, जी चांगलीच गाजली.

सदाशिव यांना चित्रपट निर्माते गोविंद निहलानी यांनी 'अर्धसत्य' चित्रपटात पहिला ब्रेक दिला होता. ही भूमिका जरी छोटी असली तरी त्याच्या व्यक्तिरेखेचं खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यानंतर सदाशिव यांनी विधू विनोद चोप्राच्या यांच्या 'खामोश' चित्रपटात उत्तम भूमिका साकारली.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत सदाशिव यांने 'आखरी रास्ता' या चित्रपटात एक उत्कृष्ट भूमिका साकारली होती. त्यासाठी धर्मेंद्र सदाशिव अमरापूरकर यांना स्वत:साठी खूप भाग्यवान मानायचे. तसंच, धर्मेंद्रही तेव्हा उंचीच्या शिखरावर होते. तेव्हा सदाशिव यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली.

धर्मेंद्र यांना त्यांची स्टाईल इतकी आवडली की सदाशिवाशिवाय इतर कोणताही खलनायक त्यांना आवडत नसे. असं म्हटलं जातं की, धर्मेंद्र स्वतःला 'भाग्यवान' समजू लागले. यामुळेच की, सदाशिव अमरापूरकर त्यांच्याबरोबर दोन-चार सिनेमांत नव्हे तर तब्बल 11 चित्रपटांमध्ये दिसले.

सदाशिव यांनी व्हिलनची भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारल्या की, प्रेक्षकांनाही नायकापेक्षा व्हिलन जास्त आवडू लागले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी 300 हून अधिक हिंदी, मराठी, बंगाली, उडिया आणि हरियाणी चित्रपटांमध्ये काम केलं. खलनायकाची भूमिका साकारण्याबरोबरच त्यांनी विनोदी भूमिका देखील उत्तम साकारल्या.